मनोरंजनविश्वात नाती तुटणे काही नवीन नाही. खूप सहजतेने कलाकार एकत्र येतात आणि तितक्याच सहजतेने वेगळे देखील होतात. मात्र याला काही अपवाद देखील आहेत. बॉलिवूडमध्ये होणारे घटस्फोट खूप जास्त चर्चेत येतात. साऊथमध्ये देखील होणारे घटस्फोट तुफान गाजतात. सध्या संपूर्ण देशाला साऊथ इंडस्ट्री आणि तेथील कलाकारांची चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे साऊथ इंडस्ट्री आणि कलाकार आता प्रादेशिक राहिले नसून ते देश पातळीवर गाजतात.
साऊथ इंडस्ट्रीमधील असाच एक सुपरस्टार अभिनेता असलेला विजय थलापति सध्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. विजय लवकरच त्याची पत्नी असलेल्या संगीताला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चा सध्या साऊथ सोबतच बॉलिवूडमध्ये देखील होत आहे. मात्र या घटस्फोटाच्या बातम्यांवर विजय किंवा संगीत कोणाकडूनही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. त्यामुळे मीडियामध्ये होणाऱ्या घटफोटाच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे यात शंका आहे. सध्या विजय त्याच्या आगामी ‘वरिसु’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. संगीता नेहमीच विजयसोबत त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि इव्हेंटला उपस्थित असते. मात्र ती ‘वरिसु’ सिनेमाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात नव्हती. यासोबतच इतर अजूनही काही इव्हेंट्सला ती त्याच्या सोबत नसल्याने त्याच्या घटस्फोटाच्या चर्चाना उधाण आले.

तत्पूर्वी विजय थलापतिने १९९६ साली पहिल्यांदा एका चित्रपटाच्या सेटवर संगीताला पाहिले. संगीता विजय थलापतिची खूप मोठी चाहती होती. मुख्य म्हणजे ती इंग्लंडहून खास विजयला भेटण्यासाठी आली होती. त्यानंतर त्यांची भेट झाली, आणि या भेटी वाढल्या पुढे त्यांनी एकमेकांना तीन वर्ष डेट केले आणि नंतर १९९९ साली लग्न केले. या दोघांना एक मुलगा जेसन आणि मुलगी दिव्या ही अपत्य आहेत. संगीता नेहमीच विजयासाठी एका प्रशंसकांच्या भूमिकेतून विजयच्या आयुष्याचा मोठा आधार राहिली आहे.
प्राप्त माहितीनुसार सध्या विजय आणि संगीता वेगवेगळे राहत असून, त्यांनी खूप विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. काही मीडिया हाऊसेसने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की विजय आणि संगीताने असे काहीच ठरवले नसून, सध्या संगीता आणि मुलं अमेरिकेत सुट्ट्या एन्जॉय करत असल्याने संगीत कोणत्याही कार्यक्रमांना दिसत नाही. आता येणार काळच सांगेल या बातम्यांमध्ये किती सत्य आहे.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’
ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ