अभिनेता अनिल कपूरच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त एक गिफ्ट मिळाले आहे. आगामी ‘सुभेदार’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. प्राईम व्हिडिओने खरंतर अनिल कपूरला त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट दिली आहे.
अनिल कपूर आज मंगळवार 24 डिसेंबर रोजी 68 वर्षांचे झाले आहे. प्राइम व्हिडिओने हा खास प्रसंग चाहत्यांसाठी अधिक खास बनवला आहे. OTT प्लॅटफॉर्मने ‘सुभेदार’ चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे. ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटात अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्यासोबत राधिका मदन त्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे.
प्राईम व्हिडिओने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फर्स्ट लूक शेअर करताना लिहिले आहे की, “खास दिवशी विशेष घोषणा होणे स्वाभाविक आहे.” ओपनिंग इमेज फिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क (AKFCN) यांनी मिळून ‘सुभेदार’ चित्रपटाचा फर्स्ट लुक सादर केला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. सध्या रिलीजची तारीख समोर आलेली नाही.
हा चित्रपट सुभेदार अर्जुन मौर्य यांची कथा दाखवतो. नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटाचे आऊटडोअर शूटिंग पूर्ण झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, आता शेवटचे शेड्यूल जानेवारीमध्ये सुरू होईल. अनिल शेवटचे दिव्या खोसला कुमारसोबत ‘सावी: अ ब्लडी हाउसवाइफ’ या चित्रपटात दिसले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
यावर्षी हॉलिवूड चित्रपटांचा भाग बनले हे कलाकार; मोठ्या मंचावर सोडली अभिनयाची छाप…