प्राजक्ता माळी ही मराठी करमणूक उद्योगातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमी तिचे ग्लॅमरस फोटोशूट चाहत्यांसमोर सादर करत असते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. या चाहत्यांसाठी ती सतत काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. आता अभिनेत्री लवकरच चाहत्यांसाठी काहीतरी खास घेऊन येणार आहे. असे आम्ही नाही, तर स्वतः प्राजक्ताने सांगितलं आहे.
नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने सांगितले आहे की, ती चाहत्यांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्या हातात एक पेन आहे आणि ती वहीवर काहीतरी लिहिताना दिसत आहे. सोबतच यावर लिहिलं आहे की, “प्राजक्ताकडून लवकरच…एक सुंदर भेट.” (special gift from prajakta mali for fans is on the way)
ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “माझ्या ह्रदयाच्या अतिशय जवळ असलेली गोष्ट…माझी गूपीतं म्हणा हवं तर…लवकरच….खास तूमच्यासाठी.” आता या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे. आता प्राजक्ता काय घेऊन येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नेटकरी या पोस्टवर कमेंट्स करून त्यांची उत्सुकता व्यक्त करत आहेत.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो होस्ट करत आहे. तसेच तिने काही महिन्यांपूर्वी ‘लकडाउन’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संतोष रामदास मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग जुन्नरमध्ये पार पडले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…