Tuesday, July 9, 2024

देशाला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा परतले हिम्मत सिंग, वेबसीरिज पाहिल्याशिवाय तुम्हालाही पडणार नाही चैन

डिझनी हॉटस्टारवरील वेबसीरिज स्पेशल ऑप्सने (२०२०) लाखो चाहते बनवले आहेत. शिवाय त्याचा हिरो हिम्मत सिंग यांच्या चित्रपटांच्या यशाचे माप म्हणजे चित्रपटांसोबतच त्यांची पात्रेही प्रेक्षकांच्या स्मरणात स्थिरावतात आणि चित्रपट फ्रँचायझी बनतात. हीच गोष्ट ओटीटीला लागू होते. त्यांची पात्रे मनात घर करून जातात आणि वेबसीरिजचे नवे पर्व तयार होतात. केके मेनन अभिनित वेबसीरिज ‘स्पेशल ऑप्स १.५: द हिम्मत स्टोरी’ प्रेक्षकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर डिझनी हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पेशल ऑप्स या वेबसीरिजला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. आता वेबसीरिजच्या दुसऱ्या पर्वानेही ओटीटीचे दार ठोठावले आहे.

काय आहे ‘स्पेशल ऑप्स १.५’ वेबसीरिजची कथा
‘स्पेशल ऑप्स १.५’ वेबसीरिजची कथा एका रॉ एजंटवर आधारित असून, एजंट बनण्याच्या प्रवासात किती संघर्ष करावा लागतो, हे दाखवण्यात आले आहे. केके मेनन (हिम्मत सिंग)ची कथा दिल्ली पोलिसांच्या शेख अब्बास (विनय पाठक)च्या तोंडून सांगितली आहे. निवृत्तीनंतर विभाग किंवा शासनाकडून हिम्मत यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींवर कोणती कारवाई करावी किंवा करू नये. असा विचार करून ‘बॅनर्जी-चड्ढा’ अशी दोन सदस्यांची टीम तयार झाली. अशा परिस्थितीत कथा त्या जुन्या कालखंडात जाते. जेव्हा आरएडब्लूशी संबंधित तीन लोकांची एकामागून एक हत्या केली जाते. वरिष्ठ अधिकारी हिम्मत यांना विभागातून बडतर्फ करतात. नवीन अधिकारी विजय (आफताब शिवदासानी) सोबत मारेकऱ्यांना शोधून त्यांना शिक्षा करण्याचे काम त्याच्यावर सोपवले जाते. येथे आणखी एक अडचण आहे. काही लोकांकडून गुप्तचर माहिती शत्रू देशांपर्यंत पोहोचवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे अनेक ट्विस्ट्स घेऊन कथा पुढे जाते.

वेबसीरिजचा पहिला भाग आहे प्रभावी
पहिल्या भागात उत्तम जम बसवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये ऍक्शन कमी असली, तरी डायलॉग्ज भारी असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचवेळी ज्या लोकांनी पहिले पर्व पाहिले आहे. त्यांना माहिती आहे की, हिम्मत प्रामाणिक, समर्पित आणि खरे देशभक्त आहेत. ज्यांना राष्ट्रावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची आवश्यकता नाही.

कलाकारांचे काम आहे दमदार
या वेबसीरिजमध्ये कलाकारांनी आतापर्यंत कौतुकास्पद काम केले आहे. नेहमीप्रमाणेच केके मेनन आपल्या कामाने भुरळ घालताना दिसला. अफताबच्या अभिनयात बारकावे पाहायला मिळतात. गौतमी कपूरनेही उत्तम काम केले आहे. ही वेबसीरिज ४ भागांमध्ये दाखवण्यात आली असून, एडिटिंग, कॅमेरा वर्क आणि पार्श्वसंगीत यांनी मालिका सुंदर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकूणच, चार भागांची ही वेबसीरिज नीरज पांडेसाठी चांगली आहे आणि ज्यांनी पहिले पर्व पाहिले असेल, त्यांना दुसरे पर्वही कदाचित नक्कीच आवडेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा