Wednesday, July 3, 2024

करवा चौथनिमित्त ‘या’ अभिनेत्रींचा खास लूक, पाहा खास फोटो

करवा चौथ हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण विशेषतः उत्तर भारतात साजरा केला जातो. करवा चौथच्या दिवशी, विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. या व्रताच्या माध्यमातून, विवाहित महिला त्यांच्या पतीप्रती असलेल्या आपुलकी, समर्पण आणि प्रेमाची साक्ष देतात. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा आर्याने देखील ही सण साजरा केला आहे. श्रद्धा तिच्या सौंदर्यासाठी आणि बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. करवा चौथचा सण लक्षात घेऊन श्राद्ध आर्यने तयारी सुरू केली. दरम्यान, श्रद्धा आर्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये श्रद्धा तिच्या मोहक शैलीने कहर करताना दिसत आहे.

कुंडली भाग्य‘ या टीव्ही मालिकेतून आपला ठसा उमटवणाऱ्या श्रद्धा आर्याला (Shraddha Arya) वेगळ्या परिचयाची गरज नाही. श्रद्धा आर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, त्यामुळे श्रद्धाचे लेटेस्ट फोटो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनतात. करवा चौथच्या सणासुदीच्या काळात श्रद्धा आर्या तिच्या फोटोंद्वारे तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

करवा चौथच्या दिवशी चंद्र उगवण्याच्या काही तास आधी, श्रद्धा आर्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर करून चाहत्यांना तिचे सौंदर्याची झलक दाखवली आहे. या फोटोंमध्ये श्रद्धाने स्टायलिश निळ्या रंगाचा लेहेंगा घातलेला दिसत आहे. टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याचे हे लेटेस्ट फोटो इतके अप्रतिम आहेत की, तुम्ही त्याला लाईक केल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा आर्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहते खूप लाइक आणि कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha Arya (@sarya12)

या वर्षी श्राद्ध आर्या दुसरा करवा चौथ साजरा करत आहे. 2021 मध्ये श्रद्धाने नेव्ही ऑफिसर राहुल नांगलसोबत लग्न केले. तेव्हापासून श्रद्धा आर्या आणि राहुल त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने एन्जॉय करत आहेत. करवा चौथच्या दिवशी, चाहते श्रद्धा आर्य आणि राहुलच्या सेलिब्रेशनच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत होते. (Special photo of Kundli Bhagya fame Shraddha Arya in blue lehenga goes viral on the occasion of Karva Chauth)

आधिक वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याची मराठा आरक्षणासंदर्भात रोखठोक पोस्ट; म्हणाला, ‘तुम्ही एक नंबरचे मूर्ख आणि..’
दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेज चढला बोहल्यावर; रामचरणसह अल्लू अर्जुनचीही हजेरी, पाहा फोटो

हे देखील वाचा