Monday, February 26, 2024

कुंडली भाग्य मालिकेत ‘हा’ स्टार क्रिकेटर साकारणार भूमिका, शुटिंगचे फोटो व्हायरल

तेलींइव्हिजन जगातील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘कुंडली भाग्य’ शो ओळखला जातो. मागील अनेक वर्षांपासून हा शो यशस्वीरित्या सुरु आहे. शोला लोकप्रियता मिळण्यासाठी निर्माते वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. आजपर्यंत शोमध्ये अनेक कलाकार आले आणि गेले. नुकताच मालिकेमध्ये एक मोठा बदल झालेला दिसत असून यात एक मोठा लीप आला आहे. लीपनंतर शोमध्ये चक्क एक क्रिकेटर अभिनय करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjum Fakih (@nzoomfakih)

मागील सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कुंडली भाग्य या शोमध्ये २० वर्षांचा मोठा लीप आला आहे. या लीपनंतर शोमध्ये अनेक जुने कलाकार दिसणार नसून त्या जागी नवीन तर काही नवीन कलाकार शोमध्ये दिसणार आहे. यातच आता भारतीय क्रिकेट संघातील गब्बर अर्थात स्टार खेळाडू असणारा शिखर धवन या मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे. खोटे वाटते ना? मात्र खरंच शिखरने मालिकेची शूटिंग सुरु केली असून त्याचे काही सेटवरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

शिखर धवनच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तो मालिकेतील कलाकारांसोबत दिसत आहे. याशिवाय त्याचा सेरियलमधील गेटअप पाहून नेटकरी जाम खुश झाले असून, ते त्याला कमेंट्स करत चांगला दिसत असल्याचे सांगत आहे. या फोटोंमध्ये शिखर पोलीस युनिफॉर्ममध्ये दिसत असल्याने तो मालिकेत पोलिसांची भूमिका निभावणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. सेटवरील व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये शिखर अभिनेत्री अंजुम फकीहसोबत दिसत आहे. अंजुम शोमध्ये प्रिताच्या बहिणीची भूमिका साकारते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अविनाश- विश्वजित यांचा हॉलिवूडमध्ये धुमाकूळ! ‘या’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केले एक अधुनिक वेडिंग साँग

‘सीता रामम’ फेम मृणाल ठाकूरने गुढी पाडवाच्या शुभेच्छा देत शेअर केले फाेटाे, एकादा पाहाच

हे देखील वाचा