Wednesday, June 26, 2024

पूनमसोबत लग्नाची बोलणी करताना झाला होता ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हांचा अपमान, सासूबाई म्हणाल्या, ‘हा तर तोंडावरूनच…’

‘शॉटगन’ म्हणून ओळखले जाणारे बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यादरम्यान इतर अभिनेत्यांप्रमाणे त्यांचेही नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. मात्र, ते पहिल्या नजरेत जिच्या प्रेमात पडले, ती अभिनेत्री इतर कोणी नसून पूनम चंदीरमानी आहे. पूनम बुधवारी (०३ नोव्हेंबर) आपला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर, १९७२ रोजी हैदराबाद येथे झाला होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याशी संबंधित काही रंजक किस्स्यांविषयी जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया…

लोकप्रिय अभिनेते असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना लग्नाची बोलणी करताना ‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, असे म्हणत त्यांच्या सासू बाईनीं मुलगी देण्यास नकार दिला होता. याबाबत खुद्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एका कार्यक्रमात बोलताना खुलासा केला होता.

शत्रुघ्न सिन्हा हे हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार आवाजाने आणि संवादाने त्यांनी त्यांचा काळ चांगलाच गाजवला. त्यांच्या चित्रपटातील गाजलेले डायलॉग आजही लोकप्रिय आहेत. आपल्या कर्तुत्वाने यशाच्या शिखरावर पोहचलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा लग्नाची बोलणी करताना मात्र चांगलाच अपमान झाला होता.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा एकदा पाहुणे म्हणून ‘द कपिल शर्मा शोमध्ये’ सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या आयुष्यातील हा मजेशीर किस्सा सांगितला होता.

‘माझ्या सासूने दिला होता मला नकार’
या शोमध्ये पूनम यांच्याशी लग्न करण्याबाबतच्या अनेक गोष्टी शत्रुघ्न यांनी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की, “पूनमला पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. त्यानंतर जेव्हा लग्नासाठी मी तिच्या आईची भेट घेतली, तेव्हा त्यांनी मला पाहताच नकार दिला होता. त्यांना असे वाटत होते की, मी त्यांच्या मुलीसाठी योग्य नाही. त्यामुळे त्यांना वाटत होते की, आम्ही लग्न करू नये.”

यावेळी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की “माझा मोठा भाऊ राम सिन्हा जो अमेरिकेत शास्त्रज्ञ आहे. मी त्यांना आणि निर्माते एन. एन. सिप्पीसाहेब यांना लग्नाची बोलणी करण्यासाठी पूनम सिन्हा यांच्या आईकडे पाठवले होते. परंतु माझ्या होणार्‍या सासूबाईनी त्यावेळी थेट नकार दिला होता. इतकेच नव्हेतर त्यावेळी त्यांनी त्या दोघांना सांगितले की, ‘तु तुझ्या भावाचे तोंड पाहिले आहेस का? इतके शिकले सवरलेले असूनही त्याचे स्थळ घेऊन येत, तुम्ही मुलीच्या लग्नाची बोलणी करायला आले आहात. तुझा भाऊ तर तोंडावरूनच गुंड वाटतो.” पुढे बोलताना शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले होते की, “जेव्हा संबंध बिघडले, पुन्हा जुळले पुढे जाऊन आमचे लग्नही झाले, तेव्हा माझ्या विरोधात असणार्‍या सासुबाई माझ्या बाजूने उभ्या राहिल्या याचा अर्थ माझ्यात चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत.”

या कार्यक्रमात बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुरुवातीला खलनायकाची भूमिका करता करता थेट नायक कसे झाले याबाबत माहिती सांगितली. यामध्ये ते म्हणाले की “मला मारून मारून हिरो बनवले गेले. खलनायकाच्या भूमिकेत मी ज्यावेळी हिरोला मारायचो किंवा जेव्हा माझी एन्ट्री व्हायची त्यावेळी माझे कौतुक केले जायचे आणि हिरोला शिव्या पडायच्या. हा प्रकार चित्रपटगृहाच्या मालकाने वितरकाला अन् वितरकाने पुढे निर्मात्यांना सांगितला होता. शेवटी प्रेक्षकांच्या मागणीमुळे मला नायक बनवले गेले.”

या चित्रपटात झळकल्या होत्या पूनम सिन्हा
खरं तर शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी लग्न केल्यानंतर पूनम खूप काळ चित्रपटांपासून दूर राहिल्या होत्या. त्या शेवटच्या ‘जोधा अकबर’ चित्रपटात झळकल्या होत्या. त्यात त्यांनी ऋतिक रोशनच्या आईची भूमिका साकारली होती.

आहेत तीन अपत्यांचे पालक
शत्रुघ्न आणि पूनम हे तीन अपत्यांचे पालक आहेत. त्यांना १ मुलगी आणि २ मुले आहेत. त्यांच्या मुलीचे नाव सोनाक्षी सिन्हा असून ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तसेच त्यांच्या मुलांचे नाव लव आणि कुश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एक दिवस ती नक्कीच माझी पत्नी होईल’, ‘अशी’ आहे ‘मिस इंडिया’ स्वरूप अन् परेश यांची लव्हस्टोरी

-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत

-जेव्हा अजय देवगणने पहिल्या भेटीतच काजोलला केले होते रिजेक्ट, तिला पुन्हा भेटायची नव्हती त्याची इच्छा

हे देखील वाचा