Tuesday, May 28, 2024

शिव ठाकरेवर हाणामारीचा आराेप! सोशल मीडियावर हाेतेय शोमधून हाकालपट्टीची मागणी

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘ मध्ये गुरुवारी(दि. 17 नाेव्हेंबर)ला शालीन भानोत आणि रॅपर एमसी स्टेन यांच्यात जाेरदार भांडण पाहायला मिळाले. एका छोट्याशा वादाची सुरुवात काही मिनिटांतच हाणामारीत झाली, जी इतकी वाढली की स्टेन आणि शालीनला शांत करण्यासाठी संपूर्ण घराला पाऊल टाकावे लागले. दरम्यान, स्टेनचा मित्र शिव ठाकरे  यांनी असे पाऊल उचलले आहे की, त्याला शोमधून बाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.

भांडणाच्या वेळी शालीन भानोत (Shalin Bhanot) याने एमसी स्टॅन (mc stan) याला मागून घट्ट पकडले आणि तो त्याला सोडायला तयार नव्हता. अशा स्थितीत दोघांना वेगळे करण्यासाठी घरातील सदस्यानी पुर्ण प्रयत्न केले आणि या धक्क्यामध्ये शिव ठाकरे (shiv thakare) यांनी शालीनला तोंड दाबून ढकलण्याचा प्रयत्न केला. शिवाच्या या वागणुकीने शालीनला आणखीनच अस्वस्थ केले आणि त्यांने स्टेन सोडून शिवसाेबत भांडण सुरू केले. आता शिवला त्याच्या या वागणुकीमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत असून त्याला शोमधून काढून टाकण्याची मागणी होत आहे.

 

बिग बॉसची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री गौहर खानने शिव ठाकरेंना शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आणि म्हटले की, “शिवने खरोखरच शालीनला चेहरा धरून धक्का दिला आहे. शिवलाच शोमधून बाहेर काढायला नको का? दादागिरी आहे. शालीनने काहीही चुकीचे केले नाही, त्याला एमसी स्टेनने विनाकारण शिवीगाळ केली. त्याची भाषा फार वाईट आहे. त्याचा संपूर्ण गट गुंडा आहे.”

बिग बॉस 16 मध्ये शालीन आणि स्टेन यांच्यात टीनावरून हाणामारी झाली. शोमध्ये, टीना दत्ताचा पाय मुरडतो आणि ती वेदनांनी ओरडू लागते, नंतर शालीन तिला धरण्याचा प्रयत्न करताे, परंतु स्टेनने शालीनला तसे करण्यास मनाई करताे कारण, त्याला असे वाटले की, यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होईल, टीनाचा डॉक्टरांनी उपचार करावे अशी त्याची इच्छा होती. जेव्हा शालीन म्हणुनही मागे न आल्याने स्टेन त्याला शिवीगाळ करताे आणि त्यानंतर शालीनला राग येताे आणि दोघांमध्ये भांडण सुरू हाेतात. आता स्टॅन शोमधून बाहेर पडणार की नाही, हे वीकेंड का वार एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. (tv bigg boss 16 fans demand shiv thakare eviction after he hold shalin bhanot from face amid fight with mc stan in big boss)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘आपला देश अजूनही होमोफोबिक विचारात अडकला आहे’, असं का म्हणाला आयुष्मान खुराना?

सुंबूलला शालीनचे वेड; सलमान खानने रागवल्यानंतर ढसाढसा रडत ‘इमली’ म्हणाली, ‘मला घरी…’

हे देखील वाचा