अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत नुकतेच मुंबई विमानतळावर मुलांसोबत स्पॉट झाले होते. बऱ्याच काळानंतर, शाहिद आणि मीरा मंगळवारी (१२ ऑक्टोबर) संध्याकाळी मुंबई विमानतळावर कुटुंबासह दिसले, आणि पॅपराजींनीही त्यांचे फोटो काढले आहेत. शाहिद आणि मीरा त्यांची मुलगी मिशा आणि मुलगा जैन यांच्यासह विमानतळाच्या आत गेले. त्यादरम्यान त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले होते. शाहिदची मुलगी मिशा आणि मुलगा जैन मोठे झाले आहेत, हे पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यानंतर शाहिद आणि मीरा बुधवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी पुन्हा विमानतळावर कुटुंबासह दिसले. शाहिद आपली मुलगी मिशाचा हात धरून कारमधून उतरला, तर त्याची पत्नी मीरा राजपूतने छोट्या मुलाला जैनला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर शाहिदने जैनला आपल्या मांडीवर बसवले आणि फोटोग्राफर्सना लांब राहण्यास सांगितले. शाहिदच्या जॅकेटच्या मागच्या बाजूला ‘नो फोटोग्राफी’असे लिहिले होते.
विशेष म्हणजे शाहिद आणि मीरा क्वचितच मुलांसोबत आता सार्वजनिक ठिकाणी दिसतात. आधी हे जोडपे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिशा आणि जैन या दोघांचे फोटो शेअर करायचे, पण नंतर त्यांनी हे बंद केले. आता जवळजवळ दोन वर्षे झालेत, शाहिद सोशल मीडियावर आपली मुलगी मिशा आणि मुलगा जैन यांचे फोटो शेअर करत नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा चाहत्यांनी त्याच्या मुलाची जैन याची एक झलक पाहिली, तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की, तो जैन आहे आणि तो इतक्या लवकर मोठा कसा झाला?
चाहते शाहिद आणि मीराच्या मुलांच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, त्यांची मुले इतक्या लवकर मोठी झाली. दुसऱ्या युजरने लिहिले की, “नुकतेच लग्न झाले आहे आणि इतक्या लवकर मुले वाढले आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “शाहिद आणि मीरा यांनी आपल्या मुलांना फोटोग्राफरपासून दूर ठेवले आहे, त्यामुळे ते कधी मोठे झाले हे कळले नाही. आता पाहायला मिळाले आहे आणि ते उद्यापासून पुन्हा दिसणार पण नाही.” तसेच एकाने शाहिदच्या लहान मुलासाठी लिहिले की, “तो खूप गोंडस आहे मशाहल्लाह.”
विशेष म्हणजे शाहिद आणि मीरा राजपूत यांचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. त्यांच्या लग्नाच्या वेळी, चाहत्यांना आश्चर्य वाटले. कारण शाहिदने चित्रपटसृष्टीत मुलीशी लग्न केले नाही. शाहिद लव्ह मॅरेज करेल, असे चाहत्यांना वाटले देखील होते. मीरा शाहिदपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. दोघांमध्ये खूप चांगली बाँडिंग आहे. शाहिदप्रमाणे मीरा राजपूतही इंस्टाग्रामवर सक्रिय असते. ती अनेकदा स्वतःचे आणि शाहिदचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करते. इंस्टाग्रामवर तिचे २.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम फ्रिडा पिंटो लवकरच होणार आई, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो
-मोठी बातमी! ईडीकडून नोरा अन् जॅकलिनला समन्स; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रींची कसून चौकशी