Wednesday, March 12, 2025
Home मराठी मित्र असशील माझ्या मित्रा! स्पृहा जोशीने ‘माझ्या मित्रा’ मधून पूर्ण केली चाहत्यांची फर्माइश

मित्र असशील माझ्या मित्रा! स्पृहा जोशीने ‘माझ्या मित्रा’ मधून पूर्ण केली चाहत्यांची फर्माइश

पुन्हा एकदा स्पृहा जोशीने तिच्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या फॅन्सची फर्माइश पूर्ण केली आहे. आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून स्पृहा नेहमीच तिच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करताना दिसते. ती नेहमीच तिच्या यूट्यूब चँनेलच्या माध्यमातून ती सतत सर्वांचे मनोरंजन करत त्यांच्या कवितांच्या फर्माईशी पूर्ण करत तिच्या गोड आवाजात ती त्या कविता वाचून देखील दाखवते. या नवीन व्हिडिओमध्ये स्पृहाने तिच्या आवडत्या आणि खूपच जवळच्या असणाऱ्या कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांची ‘माझ्या मित्रा’ ही कविता वाचून दाखवली आहे.

स्पृहाने या व्हिडिओमध्ये सांगितले की, तिच्यावर अरुणा ढेरे यांचा प्रचंड मोठा पगडा आहे. तिच्या मोबाइलमध्ये देखील अरुणा ताईच्या अनेक कविता आहेत. तिला जरा डल वाटत असताना ती नेहमीच या कविता वाचते आणि ऐकते देखील. या व्हिडिओमध्ये स्पृहाने वाचून दाखवलेली कविता मैत्रीवर आधारित आहे. जीवाला जीव देणारे मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावे असे प्रत्येकालाच वाटते आणि असे मित्र प्रत्येकाच्या जीवनात असावे देखील याच मैत्रीच्या निर्मळ नात्यावर आधारित ही कविता आपणही जाणून घेऊया.

माझ्या मित्रा

ऐक ना,
मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,
अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ
बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा
तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर
आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही
कितीदा पाह्यलेय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही !

आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही
पण थांब, घाई करू नकोस,
अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही.

हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;
स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,
तर प्रेमिक असशील,
समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात
धपापतेय माझे काळीज,
तर मग तू कोण असशील ?

स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,
हाती देशील तर पती असशील,
आणि चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे
समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,
पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे
आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,
तर मग तू कोण असशील ?

मित्र असशील माझ्या मित्रा !

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा