Saturday, July 27, 2024

बॅकलेस ब्लाउज आणि ट्रोलिंगवर स्पृहाचा सडेतोड जवाब, अनेक गोष्टींचा केला खुलासा

‘माय-बाप’ चित्रपटातुन सिनेसृष्टीत पदार्पण करणारी आणि रमाबाईच्या भुमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी स्पृहा जोशी.‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’,‘उंच माझा झोका’ अशा मालिकांमधून तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. तिने चित्रपटसृष्टीत येण्याआधी अनोक नाटकातंध्येही काम केलं आहे.अभिनेत्री, गायिका,एँकर, आणि कवयित्री अशा सर्वच भुमिका ती अगदी चोख पार पाडत असते. अशी ही हरहुन्नरी अभिनेत्री नुकतंच एका यूट्यूब चॅनलच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहिली होती. यावेळी तिने अनेक विषयांवर तिची प्रतिक्रिया मांडली.

स्पृहाला ऑडीशनची वाटायची भीती
या इंटरव्यूमध्ये तिने तिच्या आयुष्यातला एक किस्सा शेअर केला त्यावेळी ती म्हणाली की,”मला सुरुवातीला ऑडीशनची फार भीती वाटायची, मी घरातून बाहेर पडायचे आणि कास्टींग डीरेक्टरला काॅल करून सांगायचे की, आज थोडं काम आहे तर मला ऑडीशनला यायला नाही जमणार. ” ती पुढे असंही म्हणाली की, “मी सुरुवातीचे बरेच दिवस असं करून ऑडीशनला जाणं टाळत होते.मला ऑडीशन फोबीया होता. त्यातुन बाहेर यायला मला खुप वेळ लागला.” यावेळी तिने एका कास्टिंग डीरेक्टरसोबतचा एक फन्नी किस्साही शेअर केला.

‘त्या ‘ बॅकलेस ब्लाउजवर झालेल्या ट्रोलींगवरही मांडलं स्पष्ट मत
या इंटरव्यूदरम्यान तिने काही वर्षांपुर्वी बॅकलेस ब्लाउजवर केलेल्या फोटोशूटमुळे झालेल्या गदारोळाविषयी तिला काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिचे मत मांडताना ती म्हणाली,” मुळात शूट करताना त्यात फार काही रिव्हिलिंग नव्हतंच. तो एक हॉल्टरनेक ब्लाऊज(backless blouse) होता.ही एक पाच-सहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. म्हणजे असंतर काही नाहीए की, आपण आसपास हॉल्टरनेक ब्लाऊज घातलेला कोणी बघीतलंच नाहीए… ”

स्पृहा(spruha joshi) पुढे म्हणाली की,”हे समजुन घेणं फार महत्वाचं आहे की, एका व्यक्तीचा भुमिका एक व्यक्ती करत असेल तर याचा अर्थ तिने खऱ्या आयुष्यातही तसंच असायला हवं असं काही नाही. किंवा तिने तसं असावं असा अट्टहास करणंही योग्य नाही. नाहीतर मला कामंच करता येणार नाही. कारण सतत मला अठराशेच्या शतकातील भुमिका कोणीच देणार नाहीए.” पुढे ती असंही म्हणाली की,” तसे प्रोजेक्ट नेहमी बनणारंच नाहीत. तसं जरी झालं आणि सतत मी त्याच भूमिका करत राहिले तर काही दिवसांनी त्याच भुमिकांमध्ये पाहुन लोकही कंटाळतील. आणि मीसुद्धा कंटाळेल. आपण स्वत:ला वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर करण्यासाठी, शोध घेण्यासाठी आपण अभिनय क्षेत्रात आलेलो असतो आणि आपल्याला वेगवेगळ्या भुमिकांमध्ये परकाया प्रवेश करता यायला हवा”

हे देखील वाचा