सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे, तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणाऱ्या महिला देखील आहेत. या व्यतिरिक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हटलं जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले. अशा या क्रांतीज्योतीची रविवारी (१० मार्च) पुण्यतिथी होती.
स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही यूट्यूबवरून तिच्या कविता, आवडली पुस्तके याबाबत माहिती शेअर करत असते. तसेच इतरांच्या कविता देखील तिच्या लयबद्ध भाषेत ऐकवत असते. तिच्या या यूट्यूब चॅनलला आणि तिच्या कवितांना चाहते देखील भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिने सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये स्पृहा सांगते की, “सावित्रीबाईंचं काम इतकं मोठं आहे आणि इतकं कमालीचं आहे की, त्याबद्दल प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. पण सोप्या भाषेत सावित्रीबाईंचं काम जगासमोर खूप कमी वेळा मांडलं गेलंय.” स्पृहा पुढे म्हणते की, “विजया वाड या सुप्रसिद्ध लेखिका आहे, ज्यांचं ‘त्या होत्या’ या नावाचं एक खूप छान पुस्तक आहे.” असे म्हणत स्पृहा त्या पुस्तकातील एक छोटासा लेख वाचून दाखवला.
अशाप्रकारे अत्यंत सुंदर लेख तिने चाहत्यांसमोर सादर केला आहे. तिच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने श्रोते देखील दंग झाले आहेत. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.
स्पृहाने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटात प्रवेश केला तिने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘प्रेम हे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘पैसा पैसा’, ‘ए पेइंग घोस्ट’, ‘देवा’, ‘बाबा’, ‘मोरया’, ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :
- म्हणून शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या नात्यात निर्माण झाला होता दुरावा, मिसेस खानने केला मोठा खुलासा
- ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये इथून पुढे कधीही दिसणार नाही नवजोत सिद्धू, हे आहे कारण
- HBD : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला पार्थ समथानने केले आहे डेट, ‘या’ कारणामुळे तुटले नाते