Saturday, June 29, 2024

शहराकडे गेलेली ती आणि जुन्या घराच्या हळव्या आठवणी, स्पृहा जोशीची ह्रदयस्पर्शी कविता होतेय व्हायरल

स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही मराठी सिने जगतातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सोज्वळ सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने स्पृहाने चित्रपट क्षेत्रात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. चित्रपटांमधील अभिनयाप्रमाणेच स्पृहा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. स्पृहा एक हरहुन्नरी अभिनेत्री तर आहेच त्यासोबतच ती एक प्रतिभावान अभिनेत्रीसुद्धा आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवरुन ती नेहमीच तिच्या नवनवीन कविता प्रेक्षंकाना ऐकवत असते. अलिकडेच तिने जुन्या घराच्या गोष्टी या विशेष भागात तिने एक सुंदर घराची कविता सादर केली आहे. पाहूया स्पृहाची हीच कविता आणि तिची सुंदर रचना.

अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्या युट्यूब चॅनेलवरुन अनेक नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या सुंदर कविता आणि शब्दरचना प्रेक्षकांनाही प्रचंड आवडत असतात. सध्या सृहाची अशीच एक कविता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ज्यामध्ये स्पृहाने जुने घर आणि त्या घराशी तिचे असलेले भावनिक नाते याची अप्रतिम शब्दात मांडणी केली आहे. स्पृहाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला असून, प्रेक्षकही त्यावर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये जुन्या घराच्या आठवणी आणि विशेष नाते सांगताना ती म्हणते की, “माणसाला माणूस दिसत नाही अशी गडद संध्याकाळ, जवळजवळ रात्रचं, पण बोळातून गल्ल्यातून घराकडे वळत गेलेली, पायाखालची वाट दिसत जाते, रस्त्यावर दिवे नसतानाही..” थोडक्यात या कवितेत स्पृहाने गाव सोडून गेलेली ती, आणि पून्हा त्या जुन्या घरात पाऊल ठेवल्यानंतर तिच्या मनात आलेल्या भावना आणि घराबद्दलच्या आठवणी, त्या घराशी असलेले भावनिक नाते आणि घर सोडल्यानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलाची उत्तम सांगड या कवितेतून घातली आहे. स्पृहाच्या या कवितेतवर तिचे चाहतेही जोरदार कमेंट करत कौतुक करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा