×

‘जी व्यक्ती खाद्यप्रेमी नाही ती मला आवडत नाही,’ ‘खादाडी’च्या स्पेशल भागात स्पृहा जोशीने केला खुलासा

मराठी सिनेजगतातील यशस्वी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीचे (Spruha  Joshi) नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिनेजगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर अभिनेत्री स्पृहा तिच्या कवितांमुळेही सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. आपल्या लेखनीतून आलेल्या अनेक कविता ती चाहत्यांपुढे मांडत असते, ज्यावर तिचे चाहतेही भरभरुन प्रतिसाद देताना दिसतात. सध्या तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे ज्यामध्ये ती मनसोक्त खाद्यावर ताव मारताना दिसत आहे. खादाडी असं नावच तिने या व्हिडिओला दिले आहे. पाहूया काय आहे हा व्हिडिओ. 

अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या युट्यूबचॅनेलवरुन नेहमीच विविध विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. कधी मोठ्या कविंच्या रचना तर कधी स्वःत लिहलेल्या कविता ती सादर करत असते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या तिच्या व्हिडिओमध्ये पुण्यामधील हॉटेलला भेट देऊन खाद्याचा आस्वाद घेताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर स्पृहाच्या चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्पृहाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये तिने पुण्यातील ५ लेवल बिस्टो बार या आलिशान हॉटेलला भेट दिल्याचे दिसत आहे. यावेळी या हॉटेलच्या ओनर अमृता शेट्टीही सहभागी झालेल्या दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरूवातीलाच स्पृहा या हॉटेलबद्दल भरभरुन माहिती सांगताना दिसत आहे. स्पृहासाठी खास अनेक प्रकारच्या रुचकर डिशेस मागवलेल्या दिसत आहेत ज्यामध्ये शॉरमा कबाब, सॅलवन मॅकी, सुशी अशा अनेक प्रकारच्या नवीन डिशेस पाहायला मिळत आहेत. या पदार्थांवर ताव मारताना स्पृहाने अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. ज्यामध्ये तिने जी व्यक्ती खाद्यप्रेमी नाही ती मला आवडतंच नाही असे सांगत स्वतःच खाद्यप्रेम दाखवलं आहे. त्याचबरोबर मला घराबाहेर पडल्यानंतर व्हेज खायला आवडत नाही असेही ती सांगत आहे.

हा  भन्नाट व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. स्पृहाच्या खाद्यप्रेमाचेही तिचे चाहते भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. स्पृहाचा हा खादाडी स्पेशल व्हिडिओ पाहून चाहत्यांनीही असे आणखी व्हिडिओ करण्याचीही तिला कमेंटमध्ये विनंती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post