Thursday, April 18, 2024

Sridevi death anniversary: आईच्या आठवणीत खुशी कपूर भावूक, शेअर केला श्रीदेवींसोबतचा लहनपणीचा फोटो

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाला (Sridevi death anniversary:)आज ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही त्या चाहत्यांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या परिवारासह अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसतायत. अशातच आपल्या आईची आठवण काढत श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर(Khushi Kapoor ) भावूक झाली आहे. खुशीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये श्रीदेवीसोबतचे न पाहिलेला फोटो शेअर केला आहे.

आईच्या आठवणीत खुशी कपूरने लहनपणीचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये श्रीदेवींसोबत खुशी आणि जान्हवी दिसत आहेत. श्रीदेवी निळ्या रंगाच्या साडीत कॅमेऱ्याकडे बघून हसताना दिसत आहेत. तर खुशी आणि जान्हवी गुलाबी आउटफिटमध्ये खूपच क्यूट दिसत आहेत. खुशीने काहीच न लिहिता हा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

khushi kapoor post

ग्रेझियाला दिलेल्या एका मुलाखतीत खुशी कपूर म्हणाली, माझी आई नेहमी स्वतःला खुप सुंदर ठेवत होती. ती नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली. जेव्हा जेव्हा तिची एन्ट्री व्हायची तेव्हा तेथिल माहोलवरुन समजायचं की ती आलीय. हे पाहून मला खुप आनंद व्हायचा. आशा आहे की, मी देखील तिच्यासारखी काहीतरी बनेन.”

खुशी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती पहिल्यांदाच दिग्दर्शक शौना गौतमच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. याची निर्मिती करण जोहरच्या धर्माटिक्सद्वारे केली जाणार आहे.

हे देखील वाचा