Saturday, June 29, 2024

मुली जान्हवी अन् खुशीसाठी खूपच पझेसिव्ह होत्या श्रीदेवी; तर लग्नानंतर ‘या’ कारणामुळे गेल्या त्या चित्रपटसृष्टीपासून लांब

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार आणि लाखो प्रेक्षकांच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी होय. चाहत्यांच्या मनात आजही श्रीदेवींच्या अनेक आठवणी ताज्या आहेत. ‘हवा हवाई’ आणि ‘चांदनी’ या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवींनी सर्वांच्या मनावर त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेतला. तर शुक्रवारी (१३ ऑगस्ट) श्रीदेवींची ५८ वी जयंती आहे.

श्रीदेवींनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपट केले. हिंदीबरोबरच त्यांनी साऊथ चित्रपटांमध्येही खूप काम केले. श्रीदेवींचे निरागसपणे मन जिंकणे असो किंवा त्यांच्या चुलबुल्या अंदाजाने सगळ्यांना हसवणे असो, त्यांची प्रत्येक स्टाइल चाहत्यांना पसंत पडली आहे. १३ ऑगस्ट १९६३ रोजी जन्मलेल्या श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांन त्या काळातील ‘लेडी अमिताभ बच्चन’ म्हटले जात असे. श्रीदेवी बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार होत्या.

श्रीदेवींनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी आई म्हणून खूप पझेसिव्ह झाले होते. पण मी पझेसिव्ह आई होण्याऐवजी खूप प्रोटेक्टिव आई आहे. एक काळ असा होता की, माझ्या मुली लग्न करून त्यांच्या आयुष्यात सेट होतील असं मला वाटत होतं, पण मी इथेच चुकले होते. त्याचबरोबर माझ्या मुलीं पुर्णपणे स्वतंत्र असतील आणि त्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात आपल्या पायावर उभ्या राहतील, अशी देखील माझी इच्छा होती.”

श्रीदेवी म्हणाल्या होत्या की, जान्हवीच्या बॉलिवूडमध्ये येण्याबद्दलही त्या खूप नाराज होत्या. त्या म्हणाल्या, “जान्हवीने जेव्हा व्यवसाय म्हणून अभिनय स्वीकारला, तेव्हा इतर आईप्रमाणे मी पण पझेसिव्ह झाले होते. मला माहीत आहे की, या व्यवसायाने मला आयुष्यात सर्व काही दिले आहे, पण जेव्हा मला तिच्या आवडीची माहिती मिळाली तेव्हा मला आश्चर्य वाटले.” दरम्यान, जान्हवीने पहिल्या धडक चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात चार्ली चॅप्लिन साकारण्यापासून ते नागिनमध्ये इच्छाधारी नागिनची भूमिका साकारुन त्यांनी चाहत्यांच्या मनावर वेगळीच छाप पाडली. १९९६ मध्ये दिग्दर्शक बोनी कपूरशी लग्न केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून स्वत:ला दूर ठेवले होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या मुली जान्हवी आणि खुशी यांच्या संगोपनाच्या काळजीमुळे चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्याचे सांगितले.

लग्नाच्या १५ वर्षांनंतर त्यांच्या मुलींनीच त्यांना चित्रपटसृष्टीत परत येण्यास प्रोत्साहित केले, असेही त्या म्हणाल्या. श्रीदेवींचा कमबैक चित्रपट २०११ चा ‘इंग्रजी विंग्लिश’ हा होता. ज्याचे दिग्दर्शन गौरी शिंदे यांनी केले होते. श्रीदेवींनी वयाच्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्या लोकप्रिय अभिनेत्री बनल्या. त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा