सर्वात धोकादायक टीव्ही शोमध्ये गणल्या जाणाऱ्या रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाडी’ या शोचा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. शोचे प्रसारण व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधी शोचे भयावह प्रोमोज सातत्याने रिलीझ होत आहेत. ज्यामध्ये रोहित शेट्टी स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसत आहे, तर कधी स्पर्धक धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत.
दरम्यान कलर्सने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर एक प्रोमो जारी केला आहे, ज्यामध्ये टीव्हीची सून सृती झा (Sriti Jha) गरम कोळशाच्या धगधगत्या कोळश्यावर चालताना दिसत आहे. सृतीला स्टंट करताना पाहून, तुम्हीही घाबरून जाल आणि सर्वात भयावह गोष्ट म्हणजे, स्टंट करताना सृती कोळश्यावर पडली, मात्र ती पडताना दाखवली नाही. (sriti jha walks on fire rope during khatron ke khiladi 12)
प्रोमोमध्ये असे दिसते की, कोळशाचे काही अंगारे जमिनीवर पडलेले आहेत, त्यामध्ये आग आहे. अभिनेत्री ज्या कोळश्यावर चालत आहे, त्यावर दोरी बांधली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री दोरीवरून सावधपणे चालत आहे, पण नंतर तिचा तोल बिघडतो आणि की खाली कोसळते.
‘खतरों के खिलाडी १२’चा आणखी एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्ही टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशीला (Shivangi Joshi) धोकादायक स्टंट करताना पाहू शकता. या व्हिडिओमध्ये शिवांगी टास्क दरम्यान विजेच्या तारांमधून काहीतरी उघडताना दिसत आहे. टास्कमध्ये शिवांगीला ४४० व्हॉल्टचा जोरदार झटका बसला आणि ती खूप किंचाळत आहे.
‘खतरों के खिलाडी सीझन १२’ २ जुलैपासून सुरू होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा