Thursday, June 19, 2025
Home बॉलीवूड सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, कोर्टाने लूक आउट सर्क्युलर केले बंद

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, कोर्टाने लूक आउट सर्क्युलर केले बंद

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakrborty) सध्या पुन्हा चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती कोर्टाच्या फेऱ्या मारताना दिसत आहे. अभिनेत्याच्या मृत्यूच्या चौकशीची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, परंतु अभिनेत्रीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लुक आऊट सर्कुलर म्हणजेच LOC प्रकरणी कोर्टाने काय निर्णय दिला आहे ते जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप झाले होते. त्यापैकी एक आरोप होता की रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून सुशांत सिंगला ड्रग्ज दिले होते. या ड्रग प्रकरणी, रिया तसेच तिचा भाऊ शोविक आणि त्यांचे वडील लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांच्याविरुद्ध लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. आज मुंबई उच्च न्यायालयाने तीच LOC रद्द केली आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने LOC विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. एलओसीमुळे रिया किंवा तिचा भाऊ न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्याचवेळी आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर अनेक खटले दाखल केले होते. रिया आणि तिच्या भावालाही पोलिसांनी अटक केली होती. नंतर तिला न्यायालयातून सोडण्यात आले, परंतु रिया आणि तिच्या भावाविरुद्ध अनेक खटले अजूनही प्रलंबित आहेत, एलओसी प्रकरण त्यापैकी एक आहे. मात्र, 2023 मध्ये रियाचा भाऊ न्यायालयाच्या परवानगीने परदेशात गेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीजनंतर जॅकी-रकुल जाणार हनिमूनला, वरपित्याने केला खुलासा
The Indrani Mukerjea Story: मुंबई हायकोर्टाचा नेटफ्लिक्सला दणका; इंद्राणी मुखर्जी वेब सिरीजच्या स्क्रीनिंगला स्थगिती

हे देखील वाचा