Thursday, March 28, 2024

बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनाही बसलाय ऑनलाइन फसवणुकीचा झटका, वाचा यादी

सध्याच्या पिढी म्हणजेच इंटरनेटचा काळ त्यामुळे सगळ्या सोई-सुविधा ऑनलाइन आणि घरबसल्या झाल्यामुळे माणुसही खुप आळशी झाला आहे. अगदी बॅंकेचे कामे देखिल घरी बसल्या झाले आहे मात्र, तेवढाच धोकाही वाढला आहे. आजकाल बाजार हाट असो किंवा कोणाला पैसे द्यायचे असतील तर आपण ऑनलाइनच पाठवत असतो. मात्र, दुसरीके याला मोठा धोका देखिल वाढला आहे. त्यामुळे अनेकांची ऑनलाइनरित्या फसवणूकही केली जाते. असंच काही या सेलिब्रिटींसोबतही झालं आहे.

पायल रोहतग
बिग बॉस फेम पायल रोहतग (Payal Rohatgi) हिच्यासोबत काही दिवसांपूर्वी ऑनलाइन फसवणूकीचा बळी झाली होती. पायलने वर्कआउट वियरसाठी ऑनलाइन शॉपिंग केली होती मात्र, साइज बरोबर आली नाही म्हणून तिने घेतलेली वस्तू परत केली होती. तिने सांगितले की, कंपनीतून एक मानूस येऊन तो सामान घेऊन गेला. कस्टमर केअरने पायलला एक फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि रजिस्ट्रेशनसाठी 10 रुपये भरण्यासाठी सांगितले, ज्यासाठी तिने कार्डचा उपयोग केला. यनंतर तिच्या अकाउंटमधून 10 रु नाही तर तब्बल 20, 238 रुपये डेबिट झाले. अभिनेत्रीसोबत ऑनलाइनरित्या एवढी रक्कम लुटली. यानंतर अभिनेत्रीने सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवली.

अन्नू कपूर
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता अन्नू कपूर (Annu Kapoor) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी यांच्या विषयी फसवणूक केल्याची बातमी समोर आली होती. ते देखिल ऑनलाइन फसवणूकीचे बळी पडले होते. माध्यमातील वृत्तानुसार अन्नू कपूर याच्याकडून तब्बल 4 लाख 36 हजार रुपयाची फसवणूक झाली होती. एका बॅंकअधिकाऱ्याचे रुप घेऊन एक व्यक्ती त्यांच्याकडे केवायसी डिटेल्स अपडेट करण्याचं नाटक करत त्यांची फसवणूक केली होती. मात्र, पोलिसांनी त्वरित हालचाल केली त्यामुळे अन्नू कपूर यांचे 4 लाख 8 रुपये परत मिळवले.

पुनीत इस्सर
‘माहाभारत’ फेम अभिनेता पुनीत इस्सर (Punit Issar)यांच्या काही दिवसांपूर्वी धक्कादायक बातमी समोर आली होती. पुनित इस्सर हे मोठ्या फसवणूकीच्या आधीन गेले होते. काही लोकांनी अभिनेत्याचे बॅंक अकाउंट हॅक करुन लाखोरुपय हडपण्याचा प्रयत्न सुरु होता मात्र, अभिनेत्याला शंका आल्याने त्याने लगेच पोलिसांना फोन केला आणि त्यामुळे लगेच आरोप्यांना पकडले गेले. दक्षिण मुंबईमध्ये अभिनेत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी अभिनेत्येचा ईमेल हॅक केला होता आणि यानंतर त्यांना कार्यक्रमामधून मिळणारे पैसे 13.76 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न करत होते मात्र, अभिनेत्याला शंका आल्याने हे प्रकरण उघडकीस आलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी

हे देखील वाचा