Friday, March 29, 2024

मोठी बातमी! दिग्गज अभिनेते अन्नू कपूर यांची ऑनलाईन फसवणूक, ‘एवढ्या’ लाखांचा लागला चुना

दिग्गज अभिनेते अन्नू कपूर हे नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांचे चर्चेत येण्यामागील कारण थोडे धक्कादायक आहे. खरं तर, अन्नू यांच्याबाबत वाईट बातमी समोर येत आहे. ती अशी की, अन्नू कपूर हे ऑनलाईन फसवणुकीचे शिकार झाले आहेत. मात्र, त्यांच्या हुशारीने तसेच बँक आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांना काही रक्कम परतही मिळाली आहे.

अन्नू कपूर यांची फसवणूक
अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनी चुकून आपल्या बँकेची माहिती आणि ओटीपी एका व्यक्तीसोबत शेअर केला होता. त्या व्यक्तीने अन्नू यांच्या बँकेतून 4 लाख 36 हजार रुपये इतर दोन बँकेतून ट्रान्सफर केले होते. आरोपीने त्यांच्याकडून केव्हायसी माहिती मागितली होती. सोबतच आरोपीने हेदेखील म्हटले होते की, तो एका खासगी क्षेत्रातील बँकेत काम करतो. त्यामुळे अन्नू कपूर यांना 4.36 लाख रुपयांचा चुना लागला. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांना 3.8 लाख रुपये परत मिळाले आहेत.

अन्नू कपूर यांना बँकेचा कर्मचारी बनून केलेला फोन
अन्नू कपूर यांना गुरुवारी (दि. 29 सप्टेंबर) बँक कर्मचारी म्हणून एका फसवणुकदाराचा फोन आला होता. त्याला त्यांच्याकडून केव्हायसी फॉर्म पूर्ण करवून घ्यायची होती. यानंतर अन्नू यांनीही त्यांच्या बँकेशी संबंधित सर्व माहिती आणि ओटीपी त्या व्यक्तीला सांगितला. ओशिवारा पोलीस स्थानकात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, “काही वेळानंतर फसवणुकदाराने 4.36 लाख रुपये अन्नू कपूर यांच्या बँकेतून काढून इतर दोन बँकांमध्ये ट्रान्सफर केले. मात्र, बँकेने लगेच त्याच्याशी संपर्क साधला आणि या व्यवहाराची माहिती दिली. सोबतच, त्यांना हेदेखील सांगितले की, त्यांच्या अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली आहे.”

अन्नू कपूर यांना पोलिसांमुळे परत मिळाले 3.08 लाख रुपये
अन्नू कपूर यांनी तातडीने ओशिवारा पोलीस स्टेशन गाठले आणि कोणत्या बँकेत पैसे ट्रान्सफर झालेत, याची माहिती दिली. यानंतर दोन्ही खाती सीझ करण्यात आली. त्यामुळे अन्नू कपूर यांना 3.08 लाख रुपये परत मिळाले. याव्यतिरिक्त आता पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे, अन्नू कपूर यांच्यासोबत अशा घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी अभिनेते जेव्हा फ्रान्स विमानतळावर पोहोचले होते, तेव्हा एका चोराने त्यांचे पाकीट चोरले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
याला काय अर्थय! ऋतिक- सैफच्या ‘विक्रम वेधा’चे ओपनिंग कलेक्शन अक्षयच्या फ्लॉप सिनेमांपेक्षाही कमी, फक्त…
कुणाचं घड्याळ हरवलंय का? कदाचित उर्फीजवळच असेल, पाहा तिचा ‘हा’ व्हिडिओ

हे देखील वाचा