Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड आलिया भट्टपासून ते संजय दत्तपर्यंत, बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी चित्रपटात साकारलीय ‘डॉन’ची भूमिका

आलिया भट्टपासून ते संजय दत्तपर्यंत, बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी चित्रपटात साकारलीय ‘डॉन’ची भूमिका

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या नायकाच्या भूमिका सोडून चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र तरीही त्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. एक काळ होता जेव्हा चित्रपटात फक्त हीरोचाच संपूर्ण दबदबा असायचा. मात्र काळ बदलत गेला, तसा चित्रपटांचे स्वरूपही बदलत गेले. म्हणूनच या कलाकारांना नकारात्मक भूमिका साकारूनही ते चित्रपटात भाव खाऊन गेले. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक झाले. कोण आहेत असे कलाकार चला जाणून घेऊ.

आलिया भट्ट (alia bhatt)
अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटामुळे सगळीकडे चर्चेत आहे. चित्रपटात आलियाने कामाठीपुरामधील एका लेडी डॉनची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संजय दत्त (Sanjay dutt)
अभिनेता संजय दत्त त्याच्या दमदार लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. संजयने ‘वास्तव’ चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट मुंबईमधील अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या जीवनावर आधारित होती. चित्रपटातील संजय दत्तच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

जॉन अब्राहम (John Abraham)
अभिनेता जॉन अब्राहमने ‘शूट आउट एट वडाळा’ चित्रपटात मन्या सुर्वेची भूमिका साकारली होती. चित्रपटातील जॉन अब्राहमच्या जबरदस्त अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटातील भूमिकेमुळे जॉन अब्राहमला आजही मन्या सुर्वेच्या नावाने अनेकजण ओळखतात.

श्रद्धा कपूर (shraddha kapoor)
हिंदी चित्रपटसृष्टीतील मनमोहक आणि नाजूक अभिनेत्री असलेल्या श्रद्धाने ‘हसीना पारकरच्या’ चित्रपटात काम केले होते. हसीना पारकर ही दाऊद इब्राहिमची बहीण होती. चित्रपटात श्रद्धाने साकारलेली लेडी डॉनची भूमिका चांगलीच गाजली होती. तिच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.

अजय देवगण (Ajay Devgn)
अभिनेता अजय देवगणने ‘वन्स अपोन टाइम इन मुंबई’मध्ये सुलतानची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मीसुद्धा झळकला होता. त्यांचा हा चित्रपट मुंबईमधील गुन्हेगारी जगतावर आधारित होता.

हेही वाचा- 

हे देखील वाचा