बॉलीवूड दिग्दर्शक बायोपिक चित्रपटांना सुरक्षित मानतात कारण त्यांना वाटते की ज्या व्यक्तीची कथा सांगितली जात आहे ती चाहत्यांना नक्कीच आवडेल. पण यापूर्वी सायना नेहवाल आणि मिताली राजसारख्या स्पोर्ट्स स्टार्सच्या कथा फ्लॉप ठरल्या आहेत. 2023मध्ये अनेक बॉलीवूड चित्रपट येणार आहेत. तुम्हाला जर बायोपिक चित्रपट पाहण्याची आवड असेल तर नक्की पाहा 2023मध्ये येणारे हे बायोपिक.
इमर्जन्सी
या चित्रपटात बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. ‘इमर्जन्सी’चा टीझर प्रदर्शित झाला असून तो काही वेळातच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. 1975 मध्ये आणीबाणीच्या काळातील एकंदरित परिस्थिती या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कंगना या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
सॅम बहादूर
अभिनेता विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये विकीसोबत अभिनेत्री सान्या मल्होत्रा मुख्य भूमिका साकारतेय. सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लो यांची भूमिका ती साकारतेय. याचसोबत फातिमा सना शेख ही दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे.
मैं अटल हूं
2023 मध्ये सर्वांच्या नजरा या चित्रपटाकडे लागल्या आहेत. हा चित्रपट माजी पंतप्रधान आणि कवी अटलबिहारी वाजपेयी यांचा बायोपिक आहे. वर्षाच्या शेवटी 25 डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसाला तो रिलीज होणार आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधानांची भूमिका साकारत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या या लूकमध्ये पंकज त्रिपाठी ओळखू देखील येत नाहीयेत. पंकज त्रिपाठी यांच्या या लूकचे प्रचंड कौतुक होत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कमाईत भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या ‘युट्यूबचा बादशाह’ भुवन बामची नेट वर्थ आहे तरी किती? जाणून घ्याच
हीच ती नैसर्गिक सुंदरता! रश्मिकाने विमानतळावर बिनधास्तपणे काढला मास्क; पाहायला मिळाला नो मेकअप लूक