मागील वर्षी आलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत सामान्य नागरिक ते दिग्गज कलाकारांपर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. रोज नवनवीन मृत्यूचे आकडे ऐकायला मिळत आहेत. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनलाही कोरोनाची लागण झाली आहे. राजनला मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते.
दिनांक २६ एप्रिल रोजी एप्रिल रोजी त्याला कोरोनाच्या उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले होते. तिहार तुरुंगाच्या एका अधिकाऱ्याने २६ एप्रिल रोजी एका केसच्या सुनावणीदरम्यान सांगितले होते की, छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर उपस्थित राहू शकत नाही. कारण त्याला कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले आहे.
छोटा राजनवर होते मोठे आरोप
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर अनेक मोठे आरोप होते. त्यात अपहरण आणि हत्या असे तब्बल ७० पेक्षा अधिक आरोप दाखल होते. त्याने मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांची हत्या केल्यामुळे, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तरीही मागील काही दिवसांमध्ये त्याला हनीफ कडावालाची हत्येच्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने सोडले होते.
हे होते खरे नाव
मुंबईमध्ये सन १९९३ मध्ये झालेल्या सीरियल बाँब ब्लास्टमध्ये छोटा राजन आरोपी होता. त्याचे खरे नाव राजेंद्र निकाळजे होते. सन २०१५ मध्ये त्याला इंडोनेशियावरून भारतात आणले होते.
या अभिनेत्रीसोबत जोडले होते नाव
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डच्या कनेक्शनबाबत अनेक चर्चा होत असतात. नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास छोटा राजनसोबत जोडले होते. तो देशातील मोस्ट वाँटेड गुंडांच्या यादीत सामील होता. राजनवर एकट्या मुंबईत ६५ पेक्षाही अधिक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाच्या या २० घटनांपैकी, आशा मकोका, पोटा आणि शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ममता कुलकर्णी आणि छोटा राजनचे अफेअरबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. असेही म्हटले जाते की, छोटा राजनमुळे ममता कुलकर्णीला बॉलिवूडमध्येे चित्रपट मिळायचे. तसेच ममता आणि छोटा राजन लग्नही करणार होते. परंतु काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नव्हते. तरीही याचा कोणताही ठोस पुरावा नाही.
‘चायना गेट’ चित्रपटाचा किस्सा
असे म्हटले जाते की, ८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची चांगलीच दहशत होती. त्याच्या एका फोनवर अनेकांना चित्रपट मिळायचे. ‘चायना गेट’ या चित्रपटाचा किस्साही खूप प्रसिद्ध आहे. त्याबद्दल म्हटले जाते की, यानंतर छोटा राजन आणि ममता कुलकर्णीचे नाते समोर आले होते.