सोशल मीडियावर अफवांना पसरायला जास्त वेळ लागत नाही. सिंघम स्टार अजय देवगणच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते, जेव्हा त्याच्या नावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत असा दावा केला जात आहे की, या अभिनेत्याला दिल्लीत पबच्या बाहेर मारहाण केली गेली. जेव्हा हे प्रकरण सर्वत्र वाऱ्यासारखे पसरू लागले, तेव्हा स्वत: अजय देवगणला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.
काय आहे संपूर्ण प्रकरण:
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ दिल्लीतील एका पबच्या बाहेरचा होता. यात दोन गटांमध्ये हाणामारी होताना दिसत आहे. सोशल मीडिया युजर्स हा व्हिडिओ अजय देवगणचा असल्याचे म्हणत होते आणि बघता बघताच हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ शेअर करत सोशल मीडिया युजर्सने असा दावा केला की, दिल्लीतील एका पबच्या बाहेर अजय देवगणला मारहाण करण्यात आली.
Ajay devgam full drunk fighting in delhi 5 star ???? Hotel…
Will government take any action who are ambushed @ajaydevgn pic.twitter.com/WF6MqwQkgZ— india in Portugal , Dr. SK (sureśa)।।बंजारा हू।। (@suresh_kumr) March 29, 2021
अजय देवगणने केले ट्विट:
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अजय देवगणने एक ट्विट करून आपली बाजू मांडली. त्याने लिहले की, “माझ्यासारखा दिसणारा कोणीतरी संकटात सापडला आहे, असे दिसून येत आहे. मला यासंबंधित बरेच कॉल येत आहेत. मी स्पष्ट करत आहे की, मी कुठेही प्रवास केलेला नाही. मी कोणत्याही वादात अडकल्याच्या सर्व बातम्या निराधार आहेत, होळीच्या शुभेच्छा.”
Some ‘doppelgänger’ of mine seems to have got into trouble.
I’ve been getting concerned calls. Just clarifying, I’ve not traveled anywhere. All reports regarding me being in any brawl are baseless. Happy Holi— Ajay Devgn (@ajaydevgn) March 29, 2021
अजय देवगणच्या टीमनेही दिले स्पष्टीकरण:
या संपूर्ण प्रकरणावर अजय देवगणच्या टीमकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याच्या टीमच्या वतीने असे म्हटले गेले की, “गेल्या वर्षी रिलीज झालेल्या तान्हाजी – द अनसंग वॉरियरच्या प्रमोशनसाठी अजय देवगण 2020 मध्ये दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीत पाऊलही ठेवले नाही. मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अजय देवगण नाही. आम्ही सर्व वृत्त एजन्सी आणि मीडिया हाऊसला विनंती करतो की, त्यांनी ही बाब दुरुस्त करावी आणि लोकांना खरी बातमी सांगावी. लॉकडाउन उघडल्यापासून अजय देवगण मैदान, मेडे आणि गंगूबाई काठियावाडीसाठी मुंबईमध्येच सातत्याने शूटिंग करत आहे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’
-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!
-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा










