Tuesday, July 9, 2024

चाहत्याने गुलाबाचे फूल देताच आर्यनने केले असे काही, चाहत्यांना दिसली शाहरुखची झलक

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या(Aryan khan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो वडिलांच्या स्टाईलमध्ये सलाम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे. एका चाहत्याने आर्यनला लाल गुलाबही दिला. आर्यनचा हा व्हिडिओ पाहून लोक त्याची शाहरुख खानसोबत तुलना करत आहेत. त्याचबरोबर यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

फैनने दिला गुलाब
आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच त्याच्या जाहिरातीचे फोटो व्हायरल झाले होते. यावर शाहरुख खाननेही भाष्य केले. त्याचवेळी आर्यन पाकिस्तानी अभिनेत्री सजलमुळेही चर्चेत आहे. आता आर्यनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो विमानतळावर आहे. दरम्यान, एका चाहत्याने त्याला गुलाबाचे फूल दिले जे त्याने स्वीकारले. यानंतर, तो वळून तिला नमस्कार करतो.

 

View this post on Instagram

 

हा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, बाप आणि मुलगा दोघांवर क्रश असलेला मी एकमेव आहे का? दुसर्‍याने लिहिले, तुमच्या वडिलांप्रमाणे सलाम करतोय. आणखी एक टिप्पणी आहे, त्याला कधीच हसताना पाहिले नाही.

मॉडेलिंग शूट चर्चेत
गेल्यावर्षी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आला होता. आर्यनला एनसीबीने मुंबईत एका क्रूझ पार्टीवर टाकलेल्या छाप्यात अटक केली होती. मीडिया आणि सोशल मीडियापासून बराच काळ गायब झाल्यानंतर आता आर्यन पुन्हा सामान्य जीवनाकडे वळत आहे. त्याने एका ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे जे शाहरुखच्या चाहत्यांना खूप आवडते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा-
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोणाला जाड म्हणून हिणवले तर कोणाला शो मधून हाकलले, ‘या’ अभिनेत्रींना करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना

साडीत खुलले नोराचे सौंदर्य
ऍडमिट होऊन 35 दिवस उलटले, तरीही राजू बेशुद्धच! भाऊ म्हणाला, ‘आता फक्त…’

हे देखील वाचा