बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या दोघांचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे मोठे प्रमाणात प्रमोशन करण्यात आले आहे. तरीदेखील चित्रपट निर्मात्यांना बॉयकॉटचा सामना करावा लागेल का? याची भीती आहे. चित्रपटातीतल मुख्य अभिनेत्री गर्भवती असताना या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती कुठेही कमतरता पडू देत नाही आहे. अशातच चित्रपटावर आधारित एक कठीण प्रश्न विचारल्यावर आलिया संतापली.
प्रमोशनदरम्यान आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, ‘बॉयकॉट ट्रेंड सुरू असताना हा चित्रपट रिलीज करण्याचा योग्य वेळ आहे का?’ यावर आलिया म्हणाली की, “वातावरण एवढेच आहे की, आता सप्टेंबर आहे आणि ऑक्टोबर येणार आहे.”
View this post on Instagram
बॉयकॉटसारख्या गोष्टी बाजूला सारत आलिया म्हणाली, “कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हे अतिशय सुंदर वातावरण आहे. यावेळी आपल्याला निरोगी आणि सुरक्षित राहण्याची गरज आहे. आयुष्यात जे काही मिळाले त्याबद्दल आभार मानले पाहिजे.” आलियाने पत्रकारांच्या प्रश्नावर अशाप्रकारे सडेतोड प्रत्युत्तर दिले.
आलिया पुढे म्हणाली, “असे काहीही बोलू नका. सर्व काही चांगले आणि सकारात्मक आहे. आम्ही खूप आनंदी आहोत की, चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली. पुन्हा एकदा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहेत.” नुकतेच आलियाला महाकालेश्वरला जाण्यापासून रोखण्यात आले होते, त्यानंतर अयान मुखर्जी खूपच निराश दिसत होते.
बॉयकॉट ट्रेंडवर बाेलताना रणबीर म्हणाला की, “मी माझ स्वत:चं उदाहरण देताे. काही आठवड्यापूर्वी माझा ‘शमशेरा’ चित्रपट रिलीज झाला हाेता. त्यावेळी मी कुठलाही नकारात्मक विचार केला नाही. तरीदेखील चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चालला नाही. कारण प्रेक्षकांना चित्रपट आवडला नाही. अखेर फक्त कंटेंट महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही चांगला चित्रपट देता, चांगला कंटेंट देता, तेव्हा प्रेक्षकांचं मनाेरंजन होईल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
क्या बात है! श्रेयस अन् मुक्ता खेळणार ‘आपडी थापडी’चा खेळ, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
‘माझ्या वडिलांच्या जीवाला धोका, रितेश-अभिषेक मदत करा’, प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचे ट्वीट व्हायरल
बाबो! पोटात बुक्क्या मारत राहिला व्यक्ती, सहन न झाल्याने अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल