Saturday, June 29, 2024

धक्कादायक! बिग बॉस कन्नडच्या माजी कंटेस्टेंटचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; सासरच्यांवर केले गंभीर आरोप

बिग बॉस कन्नडची माजी स्पर्धक चैत्रा कोटूरने गुरुवारी (8 एप्रिल) फिनाईल पिऊन स्वत: ला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वृत्तानुसार, चैत्रा त्यावेळी कर्नाटकमधील कोलार येथे तिच्या घरी होती. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती बिग बॉस कन्नडच्या सिझन 7 चा भाग राहिली आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक लेखकही आहे. चैत्राची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त तिने सासरच्यांवर गंभीर आरोप केल्याचीही बातमी समोर येत आहे.

वृत्तानुसार, चैत्राने गेल्या महिन्यात व्यावसायिक नागार्जुनशी लग्न केले होते. मंदिरात झालेल्या त्यांच्या लग्नाचे काही फोटोही व्हायरल झाले होते. आयएएनएसच्या (IANS) वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘चैत्रा अनेक वर्षांपासून नागार्जुनसोबत नात्यात होती. परंतु ती तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हती.’

त्याचवेळी नागार्जुन म्हणाला की, ‘त्याने अभिनेत्रीशी स्वत: च्या मर्जीने लग्न केले नव्हते, तर या लग्नासाठी त्याच्यावर दबाव आणला गेला होता.’

नागार्जुनच्या घरातील सदस्य या लग्नासाठी तयार नव्हते, त्यामुळे त्यांनी चैत्राला घरात प्रवेश दिला नाही. वृत्तानुसार, चैत्राने आपल्या निवेदनात सांगितले आहे की, नागार्जुनच्या कुटुंबीयांनी तिला खूप वाईट गोष्टी ऐकवल्या, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर, दोन्ही कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

-‘खूप छान दिसते!’ ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल बनली ‘सरदारनी’, पाहा तिचा भन्नाट लूक

-‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानच्या मुलीने केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर, म्हणाली ‘…तयार आहे’

 

हे देखील वाचा