Wednesday, June 26, 2024

जेव्हा ‘बेबो’ला ‘मॅम’ म्हणून बोलवत असे सैफ अली खान; करीनाने सांगितले, ‘त्यावेळी आम्ही दुसऱ्यांना डेट…’

बॉलिवूडची ‘बेबो’ करीना कपूर आणि सैफ अली खान बॉलिवूडच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र कामही केले आहे. त्यांनी प्रथम ‘ओमकारा’ चित्रपटात एकत्र काम केले. करीना म्हणाली होती की, त्यावेळी दोघे एकमेकांशी जास्त बोलत नव्हते, तेव्हा सैफ करीनाला ‘मॅम’ म्हणून बोलवत असे. एका मुलाखती दरम्यान करीनाने याबद्दल बरेच मजेदार खुलासे केले आहेत.

फक्त व्हायचे ‘हाय- हॅलो’
करीना कपूरने ‘लूक हू टॉकिंग विथ निरंजन’ दरम्यान सांगितले होते की, ती आणि सैफ फक्त हाय- हॅलो करायचे. त्यावेळी ते दोघेही दुसर्‍या कोणाला तरी डेट करत असल्याचेही तिने सांगितले. करीना म्हणाली होती की, “सैफ वेगळ्या पिढीचा आहे. मी त्याला ओळखत होते. जेव्हा सैफ आणि लोलो ‘हम साथ साथ हैं’ मध्ये काम करत होते, तेव्हा मी सेटवर जायचे. आम्ही ‘ओमकारा’मध्ये एकत्र काम केले, तेव्हाही आम्ही एकमेकांना बोलत नव्हतो. त्यावेळी आमचे वेगवेगळे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड होते.”

करीनाने केले होते अप्रोच
करीना म्हणाली होती, “फक्त गुड मॉर्निंग व्हायचे. सैफ गुड मॉर्निंग मॅम बोलायचा आणि खूप आदराने वागायचा. सैफचे व्यक्तिमत्त्व असे आहे की, तो कोणत्याही स्त्रीला आवडेल.” करीनाने हेही सांगितले की, तिने सैफच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते. सैफ एक अशी व्यक्ती आहे, जो महिलांकडे कधीही पुढाकार घेत नाही.

करीनाची आवड पाहून सैफ झाला होता चकित
बेबोने मुलाखतीदरम्यान सांगितले की, जेव्हा तिने त्याच्यात इंटरेस्ट असल्याचे दाखवले होते, तेव्हा सैफ आश्चर्यचकित झाला. सैफला विश्वास होत नव्हता की, करीना कपूर असे करत होती. त्याला असे वाटत होते की, संपूर्ण इमारत त्याच्या डोक्यावर पडली आहे. करीना कबूल करते की, या सर्व गोष्टींसाठी पूर्णपणे ती स्वतः जबाबदार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

हे देखील वाचा