करण जोहर याचा सिलेब्रिटी टॉक शो ‘कॉफी विथ करण’ बाॅलिवूड चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जातोय. या शाेचा कंटेंट चाहत्यांमध्येच नाही, तर पाहुण्या कलाकारांमध्येही मनाेरंजनाचा विषय बनला आहे. या शाेचा नुकताच आलेला एपिसोड खूप चर्चेत हाेता. ‘फोन भूत’ चित्रपटाची स्टारकास्ट कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या शाेमध्ये उपस्थित हाेते.
‘फोन भूत’ (Phone Bhoot) चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हिच्यासोबत ‘कॉफी विथ करण शो’ (Koffee With Karan Show) यामधील हा एपिसोड फार मजेशीर हाेता. या एपिसोडमध्ये पूर्ण स्टार कास्ट धुमाकूळ घालताना दिसली. करण जाेहर (Karan Johar) याचे मजेदार प्रश्न चर्चेचा भाग बनले. रॅपिड फायर राउंडच नाही, तर गेम्सच्या दरम्यानही कॅटरिना, सिद्धार्थ आणि ईशान यांनी प्रेक्षकांचे खूप मनाेरंजन केले.
एका गेम राऊंड दरम्यान कॅटरिनाने पती विकी कौशल (Vicky Kaushal) याला काॅल देखील केला हाेता. जर ती विकीसाेबत बाेलली तर तिला एक पाॅईंट मिळणार हाेता. कॅटरिनाने हा पाॅईंट मिळवण्यासाठी पती विकीला काॅल केला. कॅटरिनाने जसा फाेन लावला, तसा विकीचा फाेन सतत व्यस्त दाखवत हाेता. यावर कॅटरिना म्हणाली की, “माझ्या नवऱ्याचा फोन व्यस्तय. हे सगळं काय चालू आहे?” मग थाेड्या वेळानंतर विकीचा परत फाेन आला. यावर करण जोहरने विचारले, ‘कुठे व्यस्त हाेता.’ कॅटरिना म्हणाली की, “तू नक्की कुणासाेबत बाेलत हाेता, बेबी तू फाेन न उचलल्याने मी एक पाॅईंट गमावला.”
या शाेदरम्यान करणने कॅटरिनाला आलिया संदर्भात एक प्रश्न विचारला. करणने विचारले की, ‘आलियाचे व्हायरल स्टेटमेंट की, ती लग्नादरम्यान मधुचंद्राच्या वेळी फार दमलेली हाेती. यावर तू काय बाेलू इच्छिते?’ कॅटरिना म्हणाली, “हा मधुचंद्राचा दिवस का होऊ शकत नाही.”
कॅटरिनाला या उत्तरावर करण, सद्धार्थ आणि ईशानची वाहवा मिळाली. मस्ती आणि विनोदांनी भरलेल्या या एपिसोडचा ट्रेलर व्हिडिओ करण जोहरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅटरिनाचे हे उत्तर खूप चर्चेत होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बाबो! पोटात बुक्क्या मारत राहिला व्यक्ती, सहन न झाल्याने अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल
ऋतिक- सैफच्या जबरदस्त एक्शनचा तडका, ‘विक्रम वेधा’चा धमाकेदार ट्रेलर
एकदा पाहाचपार्वती मातेची भूमिका साकारत असताना स्टेजवरच आला मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल