Friday, July 5, 2024

Mika Di Vohti | मिका सिंगच्या स्वयंवरची झालीय तयारी, ‘या’ दिवसापर्यंत करू शकता रेजिस्ट्रेशन

गायक मिका सिंग (Mika Singh) त्याच्या स्वयंवरची तयारी करत आहे. यासाठी तो एका रियॅलिटी टेलिव्हिजन शोमध्ये सहभागी होणार आहे, जिथे त्याला त्याचा जोडीदार मिळेल. हा शो स्टार भारत चॅनलवर प्रसारित होणार आहे. स्वयंवरवर आधारित या शोचे नाव ‘मिका दी वोटी’ आहे. आता याचा एक प्रोमो समोर आला आहे. मिकाचा हा शो लवकरच टीव्हीवर दाखवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना नोंदणी करावी लागेल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, नोंदणीची शेवटची तारीख ८ मे आहे.

प्रोमो झाला रिलीझ
प्रोमोच्या सुरुवातीला, बॅकग्राउंडला ‘रेड्डी’ चित्रपटातील ‘ढिंका चिका’ गाणे वाजवत मिका सोफ्यावर बसलेला आहे. पुढे, मिका त्याच्या कुत्र्याशी बोलतो की, आता त्याला त्याच्या आयुष्यात जोडीदाराची गरज आहे. मिका म्हणतो, “लंडन असो, पॅरिस असो किंवा झुमरी तलैया… किती लग्ने आणि पार्टी होतात हे तुम्हाला माहिती आहे. माझ्या गाण्यांवर लाखो नाती आणि करोडो हृदये जोडली जातात. पण माझ्या हृदयाच्या जोडणीबद्दल मी कधीच विचार केला नाही.” (story mika di vohti promo mika singh will search his partner in swayamvar)

तसेच, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मिका त्याच्या लाइफ पार्टनरच्या शोधात आहे. कोणत्या नशिबवानावर येईल मिकाचे हृदय?”

चौथा सेलिब्रिटी आहे मिका सिंग
मिका सिंग टीव्हीवर जोडीदार शोधणारा चौथा सेलिब्रिटी असेल. यापूर्वी राखी सावंत, रतन राजपूत आणि राहुल महाजन यांनी स्वयंवर शो केले आहेत. रिपोर्टनुसार, मिका केवळ शोमध्ये लग्न करणार नसून खऱ्या आयुष्यात जोडीदाराच्या शोधात ते नाते जोपासणार आहे. आधी त्याला समजेल आणि मग तो लग्नाचा विचार करेल.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा