Tuesday, July 9, 2024

जेव्हा गंगूबाई काठियावाडीने थेट पंतप्रधान नेहरूंनाच केलं लग्नासाठी प्रपोज! काय होतं नेमकं प्रकरण

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या दिवशी या चित्रपटाचा ट्रेलर आला, जो खूप पसंत केला गेला. ही कथा एस हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाईंचा प्रभाव फक्त अंडरवर्ल्ड आणि गुंडांपर्यंतच नव्हता, तर बडे राजकारणीही त्यांच्यावर प्रभावित होते. गंगूबाईंनी महिला सक्षमीकरण शिखर परिषदेत वेश्याव्यवसायाच्या बाजूने असे भाषण दिले होते, जे चर्चेत आले होते. हळुहळू गंगूबाईंची चर्चा त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यंत पोहोचली. पुस्तकात एका घटनेचा उल्लेख आहे, जेव्हा गंगूबाईंनी नेहरूंना विचारले की, ते त्यांना मिसेस नेहरू करू शकतात का? जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…

करीम लालाला बनवलं मानलेला भाऊ
मुंबईतील रेड लाईट एरिया कामाठीपुरा येथे असे एकही घर नाही की, जिथे गंगूबाईचा फोटो नसेल. गुजरातच्या एका संपन्न कुटुंबातील गंगा हरजीवनदास ही मुलगी प्रेमात फसून गंगूबाई झाली. त्यांना अभिनेत्री व्हायचं होतं. त्या वडिलांचे अकाउंटंट रमणिक लाल यांच्या प्रेमात पडल्या आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या पतीने ५०० रुपयांत त्यांचा सौदा केला. गंगूबाईंनी परिस्थितीशी तडजोड केली, पण मनाशी ठरवले की इतर कोणत्याही मुलीवर असा अन्याय होऊ देणार नाही. गंगूबाईंच्या घरी मोठमोठे गुंड यायचे आणि त्यांनी करीम लालाला भाऊ बनवले होते. (story propose day when gangubai kathiawadi proposed jawaharlal nehru for marriage)

पंतप्रधानांपर्यंत पोहचला होता गंगूबाईंचा आवाज
गंगूबाईंनी रेड लाईट एरियाची स्थिती सुधारण्यासाठी कंबर कसली होती. महिला सबलीकरणाच्या शिखरावर गंगूबाईंनी असे भाषण केले, ज्याचा आवाज देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत पोहोचला. या भाषणात गंगूबाईंनी शहरी भागातील वेश्याव्यवसायावर भर दिला. रेड लाइट एरियाची स्थिती सुधारण्याची त्यांची इच्छा पाहून जवाहरलाल नेहरू प्रभावित झाले होते.

जेव्हा पंतप्रधान नेहरूंना भेटल्या गंगूबाई
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा गंगूबाईंना जवाहरलाल नेहरूंना भेटण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी नेहरूंना त्यांच्या भाषणातून लैंगिक कामगारांची स्थिती सुधारण्याचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर मांडण्यास सांगितले. असे काहीतरी करावे, जेणेकरुन लैंगिक उद्योगातील महिलांना समान हक्क मिळावेत आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता येईल, असे आवाहन गंगूबाईंनी त्यांना केले.

गंगूबाईंच्या प्रस्तावाचे नेहरूंकडे नव्हते उत्तर
जवाहरलाल नेहरू गंगूबाईंवर खूप प्रभावित झाले होते. भेटीदरम्यान, त्यांनी गंगूबाईंना विचारले की, एक चांगला नवरा निवडून चांगले जीवन जगू शकत असताना त्यांनी ही नोकरी का निवडली. रिपोर्ट्सनुसार, यावर गंगूबाईंनी नेहरूंना विचारलं, “तुम्ही मला मिसेस नेहरू बनवाल का?” जवाहरलाल नेहरूंकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा गंगूबाई म्हणाल्या, “उपदेश करणं खूप सोपं आहे, पण करणं अवघड आहे.” 

दरम्यान ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये त्यांनी भुमिका आलिया भट्टने साकारली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा