Saturday, June 29, 2024

खरंच! राहुल वैद्य आणि दिशा परमारने केले गुपचुप लग्न? फोटो पाहून चाहते करतायत अभिनंदन

‘बिग बॉस १४’ चा उपविजेता राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारचे काही फोटो गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही वर- वधूच्या वेशात दिसत आहेत. आता तर स्वतः राहुल-दिशाने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. राहुल आणि दिशाचे हे फोटो पाहून, चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.

राहुलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत ‘ही एक नवीन सुरुवात आहे’, असे लिहिले आहे. याव्यतिरिक्त, काही व्हिडिओ क्लिप्सही व्हायरल होत आहेत, ज्यात अली आणि जॅस्मीनही त्यांच्यासोबत दिसत आहेत. तसेच फॅनपेजवरही हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

तथापि, या दोघांच्या लग्नासाठी चाहत्यांना आणखी थांबावे लागेल, कारण वृत्तानुसार हे फोटो खरे नसून रील लाईफचे आहेत.

राहुल वैद्यने दिशासोबतचे एक अतिशय गोंडस फोटो शेअर केले आहेत. यात राहुल वर म्हणून सजलेला आहे आणि दिशा वधूप्रमाणे सजली आहे. दिशानेही हेच फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. आता चाहते या पोस्टवर त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. मात्र, या वेशभूषेमध्ये राहुल आणि दिशाचे फोटो गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वृत्तांनुसार राहुल आणि दिशाचा एक नवीन संगीत व्हिडिओ येत आहे. हे फोटो आणि व्हिडिओ क्लिप त्याच गाण्याच्या संदर्भातील आहेत.

काही दिवसांपूर्वीच राहुल वैद्य आणि दिशा परमार या गाण्याचे शूट करण्यासाठी चंदीगडला गेले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जेव्हा ते लग्न करतील तेव्हा सर्वांसमोरच करतील. त्याचवेळी दिशाने सांगितले की, तिने तारिख निश्चित केलेली नाही, परंतु कोरोनाची परिस्थिती पाहून ते निर्णय घेणार आहेत.

राहुल वैद्यने ‘बिग बॉस 14’ द्वारे लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. या सिझनमध्ये त्याची आणि दिशाची लव्हस्टोरी खूपच चर्चेत आली होती. शो दरम्यानच त्याने दिशाला प्रपोज केले होते. यानंतर दिशा बिग बॉसच्या घरात आली आणि त्याचे प्रपोजल स्वीकारले. शोमध्ये आल्यावर राहुलची आई म्हणाली होती की, लग्नाची तयारी चालू आहे आणि लग्न लवकरच होईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

-‘खूप छान दिसते!’ ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल बनली ‘सरदारनी’, पाहा तिचा भन्नाट लूक

-‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानच्या मुलीने केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर, म्हणाली ‘…तयार आहे’

हे देखील वाचा