‘लाज शरम सर्व विकली का?’, म्हणत रश्मी देसाईचा छोट्या कपड्यांमधील डान्स पाहून चाहत्यानेच केले ट्रोल

story rashmi desai trolled for dancing in revealing outfits during corona


टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आणि माजी बिग बॉस स्पर्धक रश्मी देसाई गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर जोरदार धमाल करत आहे. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमी चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत असतात. आता रश्मीने नुकताच तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने शॉर्ट स्कर्ट आणि ऑफ शोल्डर टॉप घातला आहे. या व्हिडिओमध्ये ती रस्त्यावर नाचताना दिसत आहे. मात्र, या व्हिडिओमुळे रश्मीला जोरदार ट्रोल केले जात आहे.

रश्मीने केला जबरदस्त डान्स
इंस्टाग्रामवर रश्मी देसाईचे तब्बल ४.२ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी, ती सतत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती कार्डी बीच्या ‘आय नो दॅट्स राईट’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. रश्मीच्या काही चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला आहे, तर अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे.

अनेकांनी केले रश्मीची ट्रोल
एका युजरने लिहिले आहे, “कोरोना आहे घरीच राहा.” त्याच वेळी एकाने असे लिहिले की, “स्कर्ट वर जाण्याचं काहीच टेंशन नाही.” दुसर्‍या युजरने लिहिले, “अरे, दीदी हे काय झालं?” त्याचवेळी रश्मीच्या एका चाहत्याने लिहिले आहे, “कुठे जायचा प्रयत्न करत आहात, रश्मी जी? लाज शरम हे सर्व विकले का? ग्लॅमर म्हणजे काहीही परिधान करणे नाही. तू माझी आवडती होतीस, पण आता नाहीस.”

टीव्हीचा लोकप्रिय चेहरा
कामाबद्दल बोलायचे झाले, तर रश्मी देसाई टीव्हीसह बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने भोजपुरी चित्रपटातही काम केले आहे. ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’, ‘नच बलिए’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ अशा शोचा ती एक भाग राहिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनाविरुद्धच्या लढाईत विराट कोहली आणि अनुष्का शर्माची उडी, आपल्या मोहिमेत सहभागी होण्याचे चाहत्यांना केले आवाहन

-बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी रणबीर कपूरने केले होते ऑस्कर नॉमिनेटेड शॉर्ट फिल्ममध्ये काम, पाहा व्हिडिओ

-‘कोरोनाने लहान- मोठे भेद मिटवून टाकले आहेत..’, म्हणत क्रिती सेनन कोरोनाच्या परिस्थितीवर झाली व्यक्त


Leave A Reply

Your email address will not be published.