अभिनेत्री स्वरा भास्कर शुक्रवारी (९ एप्रिल) आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे चाहते आणि मित्र तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती केक कापताना दिसत आहे. तिच्या वाढदिवसाच्याआधी, तिच्या कुटुंबीयांनी तिला एक सरप्राईझ दिले. यावेळी स्वरा खूप भावनिक झालेली दिसते आहे. स्वराने स्वत: ला सर्वात भाग्यवान सांगितले आहे.
स्वरा भास्करने व्हिडिओ शेयर करत लिहिले की, “माझ्या पालकांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी संद्याकाळी सरप्राईझ ठेवले होते. हे सगळंच माझ्यासाठी सरप्राईझ होतं. मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. जिला असे कुटुंब आणि मित्र मिळाले.”
सोनम कपूरने स्वराच्या वाढदिवशी पोस्ट देखील केली आहे. तिने लिहिले, “प्रेमळं बहीण, आपण फक्त १ दिवसासाठी बोललो, आणि असे वाटले की, ही मैत्री देवाने बनवली आहे. साक्षी, बिंदिया आणि चंद्रिका, कोणतीही भूमिका तू निभावली असली, तरीही त्यातली माझी आवडती तू ऑफ स्क्रीनवरचं असणार. वेळेसोबत तुझा आवाज अजून शक्तिशाली होऊ दे. भरपूर प्रेम. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
यावर स्वराने उत्तर दिले आहे, “सोनम, तुझ्यावर खूप प्रेम आहे तू सर्वोत्कृष्ट आहेस.” स्वराने आतापर्यंत ‘प्रेम रतन धन पायो’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘तनू वेड्स मनू’, ‘गुझारिश’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर