Friday, July 5, 2024

‘तू राहुल गांधींचे भाषण लिहिले?’ टोला मारत विचारलेल्या युजरच्या प्रश्नावर कॉमेडियन वीर दास म्हणाला…

स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास (Vir Das) काही दिवसांपूर्वी त्याच्या एका व्हिडिओमुळे वादात सापडला होता. ज्यानंतर मोठ्या संख्येने लोकांचा राग त्याच्याविरोधात पाहायला मिळाला. दरम्यान पुन्हा एकदा वीर दास चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण राहुल गांधी आहेत. एका ट्विटर युजरने वीर दासला विचारले की, त्याने राहुल गांधींचे ‘टू इंडिया’ भाषण लिहिले आहे का, जे त्यांनी बुधवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान दिले होते. त्याचवेळी वीर दासनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटर युजरचा प्रश्न
अलीकडेच एका ट्विटर युजरने लिहिले की, “नमस्कार वीर दास, तू राहुल गांधींचे भाषण लिहिले का? तसे असल्यास, तुझी स्क्रिप्ट बदल. आणि नाही, तर राहुल तुम्ही तुमचा स्पीच रायटर बदला, तो खूप स्टँड अप कॉमेडी बघतोय.” यासोबतच ट्विटर युजरने #Parliament असेही लिहिले आहे.

वीर दासने दिले उत्तर
हे ट्वीट काही वेळातच व्हायरल झाले, त्यानंतर वीर दासने त्याला उत्तर दिले. वीर दासने ट्वीट रिट्वीट करत लिहिले की, “नाही, मी लिहिले नाही. २ राष्ट्रे आणि भिन्न व्हर्जन संकल्पना आपल्या दोघांच्या अस्तित्वाच्या खूप आधीपासून आहे. फक्त एकच… म्हणजे तुमचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद.”

काय होते वीर दासचे विधान?
कॉमेडियन वीर दासचा एक वादग्रस्त व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने भारताला दुहेरी चारित्र्याचा देश म्हटले होते. ‘आय कम फ्रॉम टू इंडिया’मध्ये वीर दासने कोव्हिड-१९ महामारी, बलात्काराच्या घटना आणि कॉमेडियन्सवरील कारवाई ते शेतकरी निषेध या मुद्द्यांचाही उल्लेख केला. व्हायरल व्हिडिओमध्ये वीर दास “मी भारतातून आलो आहे, जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री सामूहिक बलात्कार करतो,” असे म्हणताना ऐकू येत आहे.

वीर दासने मागितली माफी
वीर दासच्या या विधानाचा सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाला होता. यासोबतच दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले होते. वाद वाढत असल्याचे पाहून त्यांनी सोशल मीडियावरच माफी मागितली. आपल्या स्पष्टीकरणात तो म्हणाला होता की, देशाचा अपमान करण्याचा त्याचा हेतू नव्हता, तर मतांच्या मुद्द्यावरूनही भारत महान आहे, याची आठवण करून देण्याचा त्याचा हेतू आहे.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा