विजय सेतुपतीच्या चित्रपटाच्या सेटवरुन एक दु:खद बातमी समाेर आली आहे. स्टंटमॅन सुरेश यांचा वयाच्या अवघ्या 54 वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शाेककळा पसरली आहे. चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना सुरेश यांना आपला जीव गमवावा लागला.
स्टंटदरम्यान अचानक तुटली दाेरी
वेत्री मारन दिग्दर्शित ‘विदुथलाई’ चित्रपटाच्या सेटवर ही दुःखद घटना घडली. ट्रेनच्या अवशेषापासून हा सेट तयार करण्यात आला होता. माध्यमातील वृत्तानुसार, सुरेश (stuntman suresh) यांना सीननुसार जंपिंग स्टंट करायचा होता, त्यासाठी त्यांना क्रेनच्या साहाय्याने दोरीने बांधण्यात आले होते, पण स्टंट करत असताना अचानक दोरी तुटली आणि ते सुमारे 20 फूट उंचीवरुन पडले.
अपघातात सहकारी समन्वयकही जखमी
चित्रपटाच्या मुख्य स्टंट दिग्दर्शकाच्या उपस्थितीत सुरेश त्यांचे असिस्टेंट म्हणून काम करत होता. जेव्हा ते स्टंट करत होते तेव्हा ते त्यांच्या सहकारी समन्वयकांसह तेथे उपस्थित होते. अपघात झाला तेव्हा सहकारी समन्वयकही त्यांच्या प्रभावाखाली येऊन जखमी झाले. अपघातानंतर सुरेश यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. विजय सेतुपती यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाच्या सेटवरील अनेक फाेटाे शेअर केली आहेत. विजयने सांगितले की, “चित्रपटाच्या पहिल्या भागाचे शूटिंग संपले आहे.” दुसर्या भागाचे शूटिंग सुरू असताना, ही घटना घडली.”
स्टंटमॅन गेल्या 25 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत करत हाेते काम
माध्यमातील वृत्तानुसार, सुरेश गेल्या 25 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीशी स्टंटमॅन म्हणून काम करत हाेते. विजय सेतुपतीसोबत या चित्रपटात सुरी, विजय तसेच प्रकाश राज, गौतम मेनन, किशोर, भवानी श्री, राजीव मेनन, चेतन यांसारख्या स्टार्सनी भूमिका केल्या आहेत. चित्रपटातील बहुतांश दृश्ये सत्यमंगलमच्या जंगलात शूट करण्यात आली आहेत. (stuntman suresh dies on vija sethupathi film set fell from 20 feet height)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दीपिका पदुकोणचा मॉर्निंग लूक! शेअर केल्या स्किन केअरसाठी 5 महत्वाच्या टीप्स
गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी दिलजीतचा सरकारवर निशाणा; म्हणाला, ‘100% सरकारची…’