Tuesday, January 31, 2023

गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी दिलजीतचा सरकारवर निशाणा; म्हणाला, ‘100% सरकारची…’

दिलजीत दोसांझ हा पंजाबमधील सर्वोत्कृष्ट गायकापैकी एक आहे. दिलजित त्याच्या आवाजासाठी आणि दयाळू स्वभावासाठी ओळखला जातो. दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा सिद्धू मुसेवाला आणि दीप सिद्धू याच्या मृत्यूवर बोलला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येसाठी त्यांनी सरकारला जबाबदार ठरवले. 29 मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

एका मुलाखतीदरम्यान दिलजीत दोसांझ (diljit dosanjh) याने सिद्धू मुसेवाला (singer sidhu moosewala) याच्या पालकांबद्दल सांगितले. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना किती वेदना होत असतील, याबाबतीत ताे बाेला. याशिवाय त्यांनी याप्रकरणासाठी सरकारला जबाबदार ठरवले. तो म्हणाला,”या सर्वांनी आपल्या आयुष्यात खूप मेहनत केली आहे. मला नाही वाटत की, एखादा कलाकार कोणाचेही वाईट करू शकतो. मी माझा अनुभव सांगत आहे. त्याच्यात आणि कुणाच्यात काहीतरी घडू शकते, हे मला वाटत नाही. याबद्दल बोलणे देखील कठीण आहे. तुम्ही विचार करा की, एखाद्याला मुलगा झाला आणि तो मेला तर त्याचे आई-वडील त्याच्याशिवाय कसे जगतील, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.”

दिलजीत पुढे म्हणाला की, “याला 100 टक्के सरकार जबाबदार आहे. हे राजकारण आहे आणि राजकारण अत्यंत घाणेरडे आहे. त्याला न्याय मिळावा आणि अशी दु:खद घटना पुन्हा घडू नये यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. आपण या जगात एकमेकांना मारण्यासाठी आलो नाही. यापूर्वीही कलाकारांच्या हत्या झाल्या आहेत. मला आठवते की, मी सुरुवात केली तेव्हा समस्या होत्या. लोकांना आश्चर्य वाटायचे की, हा माणूस इतका यशस्वी का होतोय? मात्र, कुणाला तरी मारणे हे अगदी चुकीचे आहे. यात 100% सरकारची चूक आहे आणि माझ्या मते हे राजकारण आहे.”

पंजाब पोलिसांनी ज्यांची सुरक्षा तात्पुरती कमी केली होती अशा 424 लोकांमध्ये मूसवाला यांचा समावेश होता. गायकाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार याने जबाबदारी स्वीकारली होती.(singer diljit dosanjh blame government failure for singer sidhu moosewala murder)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर कपिलने 3 महिने उचलला नव्हता ‘पत्नी’चा पदर, कॉमेडियनचा मोठा खुलासा
कलाविश्व हादरले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये आगीचे तांडव, जीव वाचवण्यासाठी मुलीने मारली उडी

हे देखील वाचा