बॉलिवूड अभिनेता आणि उद्योगपती साहिल खान (Sahil Khan) विवाहबंधनात अडकला आहे. त्याने 9 फेब्रुवारी 2025 रोजी मिलेना अलेक्झांड्राशी लग्न केले, ज्याची माहिती त्याने आता सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. मिलेनाचे वय 22 वर्षे आहे, तर साहिल तिच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठा आहे.
‘स्टाईल’ सारख्या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या साहिलने त्याच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. साहिलने रशियात मिलेनाशी लग्न केले. या दोघांचे आधीच कागदावर लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी 2024 ही त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित केली होती. पण नंतर 9 फेब्रुवारी 2025 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा केक सात थरांचा होता, त्यात गुलाबी आणि राखाडी रंगाचे मिश्रण होते. केक पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आला होता आणि त्यावर लग्नाची तारीखही लिहिली होती.
साहिलने त्याच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच. यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. एका चाहत्याने लिहिले, “व्वा… तुम्हाला आयुष्यभर आनंद आणि सहवास लाभो.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “साहिल भाई तुमच्या लग्नाचा फोटोही अपलोड करा, आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे… आणखी एका चाहत्याने कमेंट केली, “तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसता.” तुमचा जीवनसाथी होण्यासाठी तुम्ही एका अद्भुत स्त्रीची निवड केली आहे आणि ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे स्पष्टपणे दिसून येते. ती खऱ्या अर्थाने हिरा आहे. सर्वात सुंदर जोडपे. ”
मिलेना ही साहिल खानची दुसरी पत्नी आहे. तो बेलारूस (युरोप) येथील आहे. मिलेना ही विद्यार्थिनी होती आणि त्यांच्या नात्यादरम्यान तिचा अभ्यास पूर्ण झाल्याचे साहिलने सांगितले. एका मुलाखतीत साहिलने शेअर केले होते की, मिलेना स्वभावाने एक बुद्धिमान, संवेदनशील, प्रौढ आणि शांत मुलगी आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
आयफा एंबेसडर यादीतून वगळले अपूर्वा माखिजाचे नाव; अश्लील टिप्पणीनंतर घेतला निर्णय
रणवीर इलाहाबादियाच्या आधी कानन गिलनेही जॅकी भगनानीला विचारला होता हाच प्रश्न, जुना व्हिडिओ व्हायरल