Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

लाखात एक! सुबोध भावेला पत्नीकडून मिळाली लग्नाच्या वाढदिवसाची ‘ही’ खास भेट

सुबोध भावे मराठीमधील प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील नाव कमावले आहे. चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांमध्ये त्याने त्याच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच तो एक उत्तम व्यक्ती देखील आहे. त्याच्या विविध मुलाखतीमधून याची प्रचिती सर्वांनाच येत असते.

सुबोध हा जितके महत्त्व त्याच्या कामाला देतो, तितकेच महत्व तो त्याच्या कुटुंबाला देखील देतो. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये तो त्याच्या परिवारासोबत आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय अनेक मुलाखतींमध्ये तो त्याच्या कुटुंबाविषयी देखील भरभरून बोलताना आपण पाहिले आहे. सुबोधबद्दल आणि त्याच्या चित्रपटांबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. मात्र, आज आपण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणार आहोत.

अभिनेता सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी यांच्याबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. नुकताच या दोघांनी त्यांच्या लग्नाचा विसावा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या. यामध्ये सर्वात लक्षवेधी गोष्ट ठरली ती म्हणजे मंजिरीने सुबोधला दिलेली भेटवस्तू. मंजिरीच्या भेटवस्तूचा फोटो सुबोधने सोशल मीडियावर पोस्ट केला. आता तिच्यावर आणि तिच्या दिलेल्या भेटवस्तूंवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लग्नाच्या विसाव्या वाढदिवसानिमित्त मंजिरीने सुबोधला चक्क एक सायकल भेट म्हणून दिली आहे. सुबोधने या सायकलीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून मंजिरीने मला ही सायकल भेट दिली. (पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींचा तर हा परिणाम नसेल?) असो…सायकल आहे फार सुंदर आणि अर्थात उत्तम आरोग्याला उपकारक. धन्यवाद शैलेश परुळेकर सर ही भेट सुचवल्याबद्दल.” सध्या सुबोधची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टवर फॅन्ससोबतच कलाकार देखील कमेंट्स करताना दिसत आहेत.

तत्पूर्वी सुबोधने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले होते की, ‘लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप काही न लिहिता फक्त एवढेच लिहिले होते की, “‘तू तिथे मी’ इतकंच.”

अशा प्रकारे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा