नवीन वर्ष सुरु झाले आणि आता नवनवीन मोठमोठ्या कलाकारांनी त्यांचे सिनेमे जाहीर करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. बॉलिवूडसोबतच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी चित्रपटांची माहिती देत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील देखणा आणि प्रभावी अभिनेता अशी ओळख असलेल्या सुबोध भावेने देखील त्याच्या एका आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा केली आहे.
सुबोध भावेने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. हा सिनेमा आहे ‘फुलराणी’. या पोस्टरसोबत त्याने लिहिले, “हटके तिची स्टाईल, फाडु तिची स्माईल…बिनधास्त तिची अदा, दुनिया तिच्यावर फिदा..! नव्या वर्षाची Announcement…”, सुबोध भावेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी आणि त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याला सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोध भावेचा हा सिनेमा गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सुबोधच्या या पोस्टनंतर सर्वांनाच त्याच्या या आगामी सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र आता या सिनेमात फुलराणी नक्की कोण साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. समोर आलेल्या पोस्टरवरून अनेक तर्क वितर्क लावले जात असले तरी त्या अभिनेत्रीबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वीच सुबोधचा ‘हर हर महादेव’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सुबोधने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. नुकतीच सुबोधच्या निर्मिती संस्थेत कान्हाज मॅजिकमध्ये तयार झालेली ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ ही मालिका सुरु झाली आहे. नुकताच सुबोधच्या ‘वाळवी’ या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गांधी गोडसे : एक युद्ध’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, चित्रपटात पाहायला मिळणार थरारक वैचारिक युद्ध
‘प्रभाससमोर ऋतिक रोशन काहीच नाही’, राजामौलींच्या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीमध्ये खळबळ