मराठीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा नेहमीच चर्चेत असतो. सुबोधने अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. सध्या सुबोधचे अनेक चित्रपट देखील रिलीज होत आहेत. मराठी सोबत आणि हिंदी चित्रपट देखील रिलीज होत आहेत आणि याचा फटका मात्र मराठी सिनेमांना बसत आहे. तो म्हणजे आजकाल मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच थिएटर मिळत नाहीये. त्याबद्दल सुबोध भावेने एका मुलाखतीत त्याचे सविस्तर असे मत मांडलेले आहे.
याबाबत बोलताना सुबोधने सांगितले की, “ही कलेक्टिव्ह करण्याची गोष्ट आहे. तक्रार करण्यापेक्षा नवीन रस्ता निर्माण केला पाहिजे, असे मला वाटतं. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही. अशी खूप बोंबाबोंब आपण करतो. मराठी चित्रपटाचे घटक म्हणून आपण यासाठी काय प्रयत्न केले आहे. मराठी चित्रपट अशी काही सुबोध भावेंची खाजगी मालमत्ता नाहीये. किंवा माझ्या आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांची खाजगी मालमत्ता नाहीये. आपण सगळ्यांनी मिळून असलेली ही एक संस्था आहे. या संस्थेचे तुम्ही घटक आहात. तसा मी एक घटक आहे. जर आपल्याला पाहिजे तसे थिएटर मिळत नाही. पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये. तर किती दिवस आपण रडत बसणार की त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून कधी काम करणार?”
यापुढे बोलताना बोलताना सुबोध भावे म्हणाला की, “माझ्या मार्केटिंगच्या माहितीनुसार सांगतो की, प्रत्यक्षात जाऊन काम केले पाहिजे. माझ्यातला एक पुणेरी, स्वाभिमानी, बंडखोर व्यक्ती सांगतो की, तेल लावत गेले मल्टिप्लेक्स. आम्हाला नाही रिलीज करायचे तुमच्याकडे चित्रपट मग काय करायचं. नळाला पाणी येत नाही , तर ना नळाला पाणी येईल याची वाट बघत बसायची आहे की, पाण्याचा शोध घ्यायचा आहे. तर पाण्याचा शोध घ्यायचाय. कारण तहान लागली आहे. मग आपण पुणे मुंबई साठी किती दिवस मर्यादित राहणार आहोत? पुणे मुंबईच्या पलीकडे नंदुरबार, लातूर, अंबळनेर इतके प्रदेश महाराष्ट्रात आहे. त्या ठिकाणी देखील मराठी प्रेक्षक आहेत तर आपण त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार?”
अशाप्रकारे सुबोध भावेने मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही यावर त्याचे थेट आणि रोखठोक मत मांडलेले आहे. आपण मराठी चित्रपटांसाठी थिएटर ची वाट न बघता प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून यासाठी वेगळ्या मार्ग शोधला पाहिजे. असे मत सुबोध भावेने व्यक्त केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘मला हिंदी सिनेमाच्या ऑफर आल्या होत्या पण..’ अलका कुबलने सांगितले मोठे कारण
कॅन्सरच्या उपचारादरम्यान पडद्यावर परतली हिना खान, ‘गृहलक्ष्मी’ बनून जिंकणार चाहत्यांची मने