प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे. ‘नागिन’ फेम अभिनेत्रीचा हा धक्कादायक व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित झाले असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देवीच्या भजनादरम्यान सुधा चंद्रन समाधीसारख्या अवस्थेत दिसत असून, अनेकांच्या मते त्या क्षणी त्यांच्यावर कोणीतरी आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन (Sudha Chandran)पांढऱ्या आणि लाल रंगाच्या साडीत दिसत आहेत. हे रंग देवीपूजेशी निगडित मानले जातात. त्यांच्या कपाळावर ‘जय माता दी’ लिहिलेली लाल चुनरी बांधलेली आहे. भजन जसजसे पुढे सरकते, तसतशा त्या भावनिक आणि अनियंत्रित होताना दिसतात. त्यांना सावरण्यासाठी तीन जण पुढे येतात. याच वेळी त्या जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा हात दातांनी चावताना दिसतात, ज्यामुळे हा व्हिडिओ अधिक चर्चेत आला आहे.
हा व्हिडिओ एका धार्मिक कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. भजनादरम्यान सुधा चंद्रन पूर्णतः भक्तीभावात तल्लीन झाल्या होत्या. व्हिडिओत त्यांच्या हालचाली आणि हावभाव झपाट्याने बदलताना दिसत असून, उपस्थित लोक त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. काही चाहत्यांनी याला आस्थेशी जोडले, तर काहींनी अशा घटनांचे सनसनाटीकरण टाळावे, असे मत व्यक्त केले आहे.
सुधा चंद्रन या भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजनमधील एक मानाचं नाव आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘नाचे मयूरी’ (1986) या चित्रपटामुळे त्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाल्या. या चित्रपटात त्यांच्या क्लासिकल डान्सर होण्याचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी ‘कहीं किसी रोज’, ‘नागिन 6’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘माता की चौकी’ आणि ‘कलयुग में भक्ति की शक्ति’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ भक्ती, श्रद्धा आणि वैयक्तिक अनुभूती यावर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकतो आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पहिल्याच चित्रपटात ऐतिहासिक यश, सारा अर्जुनने प्रेक्षकांचे मानले आभार; म्हणाली—‘नतमस्तक आहे’










