Friday, April 19, 2024

‘तब्बल ३५ वर्षे काम करूनही आमच्याकडे मागतात…’, सुधा चंद्रन यांनी उघडली इंडस्ट्रीची लाजिरवाणी गुपितं

सुधा चंद्रन (Sudha Chandran) हे केवळ टेलिव्हिजनच नाही, तर चित्रपटसृष्टीतही प्रसिद्ध नाव आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीने १९८५ मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती, या चित्रपटाचे नाव होते ‘मयुरी’. त्यांनी इंडस्ट्रीत ३५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि ती आजही कार्यरत आहे. पण अलीकडेच एका वृत्तसंस्थेशी खास बातचीत करताना सुधा चंद्रन यांनी इंडस्ट्रीबद्दल काही खुलासे केले.

सुधा चंद्रन यांनी या मुलाखतीत सांगितले की, ३५ वर्षे काम केल्यानंतरही कधी कधी त्यांच्याकडून ऑडिशन्सची मागणी केली जाते. जे त्यांना ते अजिबात आवडत नाही. सुधा चंद्रन म्हणाल्या, “मी अगदी उघडपणे सांगते, मी ऑडिशन देत नाही. जर मला ऑडिशन द्यायचे असेल, तर या इंडस्ट्रीमध्ये माझे ३५ वर्षांचे योगदान काय कामाचे? आणि जर तुम्हाला माझे काम माहित नसेल, तर मला तुमच्यासोबत काम करायचे नाही.” (sudha chandran revealed said they demand for audition after working for 35 years in industry)

लूक टेस्टचीही केली जाते मागणी
केवळ ऑडिशनच नाही, तर लूक टेस्टचीही मागणी केली जाते. त्या म्हणाल्या, “काही लोक म्हणतात एक काम करा ना, लुक टेस्ट द्या. मी म्हणाले काय लूक टेस्ट?, तुम्ही माझा चेहरा पाहिलाय?” त्याचवेळी सुधा चंद्रन यांनी सांगितले की, त्यांनी याबाबत CINTAA शीही (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) बोलले आहे. त्यांच्या मते, इंडस्ट्रीत ३०-३५ वर्षे घालवलेल्या कलाकारांना अशी वागणूक देऊ नये.

‘नागिन ६’मध्ये झळकतायेत अभिनेत्री
सुधा चंद्रन दीर्घकाळापासून ‘नागिन’ मालिकेचा भाग आहे. आता त्या ‘नागिन ६’मध्येही झळकत आहेत. या शोमध्ये त्यांना खूप पसंत केले जात आहे. या शोशिवाय त्या झी तेलुगूच्या प्रोजेक्टशीही जोडलेल्या आहेत. तसेच सुधा चंद्रन एका क्राइम सीरिजचे सूत्रसंचालनही करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटात रोमँटिक सीन देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे यश चोप्रा होते ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे
लाखो लोकांची क्रश! रश्मिका मंदानाचा हटके आणि ग्लॅमरस अंदाज

हे देखील वाचा