Saturday, July 6, 2024

सुधा चंद्रन यांनी केलं दुःख व्यक्त; सोशल मीडियाद्वारे, पंतप्रधानांना केली ‘ही’ मोलाची विनंती

प्रख्यात टेलिव्हिजन अभिनेत्री आणि प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सुधा चंद्रन यांनी गुरुवारी (२१ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली की, त्यांच्यासारख्या अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कार्ड जारी करावा. जेणेकरून विमानतळ प्रशासनाकडून ग्रिल करणे आणि अपमानित करणे थांबेल. सुधा चंद्रन यांनी हे आवाहन पंतप्रधान मोदींना एका व्हिडिओद्वारे केले आहे, जो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.

सुधा चंद्रन यांच्या एका पायात समस्या आहे, ज्यामुळे त्या कृत्रिम पाय वापरतात. सुधा यांनी इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी प्रत्येक वेळी विमानतळाच्या सुरक्षिततेतून जाताना कृत्रिम अवयव काढून टाकण्याचा त्रास व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांना प्रत्येक वेळी विमानतळावर सुरक्षेसाठी ग्रिल केले जाते, ज्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. (sudha chandran requested to pm narendra modi after hurts airport authority wanted to remove her artificial limb)

व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन यांनी पीएम मोदींना आवाहन केले आणि म्हणाल्या की, “मी सुधा चंद्रन आहे, पेशाने अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. मी माझ्या कृत्रिम अवयवांसह नृत्य केले आहे आणि माझ्या देशाला अभिमानास्पद करून इतिहास घडवला आहे. परंतु प्रत्येक वेळी जेव्हा मी माझ्या व्यावसायिक भेटीवर जाते, तेव्हा मला विमानतळावर थांबवले जाते. जेव्हा मी सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफ अधिकाऱ्यांना विनंती करते की, माझ्या कृत्रिम अवयवांची ईटीडी (एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्टर) चाचणी करा, तरीही ते मला माझे कृत्रिम अवयव काढून टाकायला सांगतात.”

त्या पुढे म्हणाल्या की, “मोदीजी हे मानवतेने शक्य आहे का? हेच आपला देश बोलत आहे का? आपल्या समाजात एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला हा मान देते, तो हाच का? मोदीजींना माझी नम्र विनंती आहे की, कृपया आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसारखे कार्ड द्या.” सुधा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच यावर युजर्सच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धक्कादायक! सेटवर झाला गोळीबार, चुकून झाडडेल्या गोळीमध्ये सिनेमॅटोग्राफरचा जागीच मृत्यू

-‘छान काम करत आहात!’ मन्नतवर पोहचलेल्या एनसीबी अधिकाऱ्यांसाठी शाहरुख खानचे उद्गार

-‘अनन्या पांडे जगातील सर्वात मोठी मूर्ख’, म्हणत ‘या’ स्टारकिडला एनसीबी चौकशीला बोलावण्याचा कमाल खानचा दावा

हे देखील वाचा