‘छान काम करत आहात!’ मन्नतवर पोहचलेल्या एनसीबी अधिकाऱ्यांसाठी शाहरुख खानचे उद्गार

मुलगा आर्यन खानवर चालू असलेली केस, शाहरुख खानच्या गळ्यातील फास बनत चालली आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन ३ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी, एनसीबीचे अधिकारी मन्नत या वांद्रे येथील शाहरुख खानच्या घरी पोहोचले होते. तर माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की, जेव्हा एनसीबीची टीम शाहरुख खानच्या घरी पोहोचली, तेव्हा अभिनेत्याने त्यांच्या कामाची प्रशंसा केली.

शाहरुख एनसीबीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला की, तुम्ही लोक खूप छान काम करत आहात. तथापि, त्याने त्यांना असेही सांगितले की, “मला आशा आहे, माझा मुलगा लवकरच तुरुंगातून बाहेर येईल.” बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकल्यानंतर, गुरुवारी (२१ ऑक्टोबर) एनसीबी टीम शाहरुख खानच्या घरी पोहोचली होती. आधी असे समोर आले होते की, एनसीबीची टीम छापा टाकण्यासाठी शाहरुखच्या घरी पोहोचली. परंतु नंतर असे अहवाल आले की, एनसीबीची टीम शाहरुखला नोटीस देण्यासाठी गेली होती. (aryan khan drugs case shah rukh khan said to ncb officers who reached yesterday his house that you are doing a good job)

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानला दिलेल्या नोटीसमध्ये असे लिहिले होते की, जर त्याचा मुलगा आर्यन खानकडे इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल, तर त्याच्या कुटुंबाला ते एनसीबीकडे सोपवावे लागेल. माध्यमातील वृत्तानुसार, एनसीबी अधिकारी व्हीव्ही सिंग आपल्या टीमसह शाहरुखला नोटीस देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. येथे त्यांनी शाहरुखसोबत काही कागदपत्राचं काम पूर्ण केलं. त्यानंतर शाहरुखने त्यांच्या कामाची प्रशंसा केली.

बुधवारी (२० ऑक्टोबर) रोजी सत्र न्यायालयानं आर्यन खानची जामीन याचिका फेटाळल्यानंतर, त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी आर्यनची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ज्यावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाने आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

तसेच, आर्यन खानला तुरुंगातून मुक्त होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. शाहरुख आणि गौरी आर्यनला सोडवण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत. शाहरुख आणि गौरीने ठरवले आहे की, मुलगा घरी परत येईपर्यंत त्यांचे कुटुंब कोणताही सण साजरा करणार नाही. शाहरुख आणि गौरीसाठी हा खूप कठीण काळ आहे आणि या कठीण काळात त्यांना त्यांच्या बॉलिवूड मित्रांकडून भरपूर पाठिंबा मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनन्या शाहरुख खानला म्हणाली होती ‘सेकंड डॅड’, नेमकं प्रकरण काय?

-आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड

-‘डीडीएलजे’ चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण; ‘या’ अभिनेत्याने नकार दिल्याने शाहरुख बनला ‘किंग ऑफ रोमान्स’

Latest Post