Wednesday, July 3, 2024

आनंदाची बातमी! कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले अडकले लग्नबंधनात, साध्या पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

बॉलिवूडमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले लग्नबंधनात अडकले आहेत. सोमवारी (२६ एप्रिल) दोघांनी जालंधरच्या क्लब कबानामध्ये, कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केले. सुगंधाची मैत्रीण आणि निर्माती प्रीती सिमोंसने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या जोडप्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.

जवळचे लोक होते लग्नाला उपस्थित
सध्या कोरोनामुळे केवळ जवळचे लोकच या लग्नाला उपस्थित होते. सोमवारी संध्याकाळी संकेत लग्नाच्या मिरवणुकीसह लग्नाच्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानंतर सर्व रीतीरिवाजांनी हा विवाह संपन्न झाला. तसेच, सुगंधाच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर आधीच सांगितले होते की, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाकडे पाहता हा सोहळा साधेपणाने होणार आहे.

बऱ्याच दिवसांपासून लपवले होते नाते
गेल्या बऱ्याच काळापासून सुगंधा आणि संकेत यांच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या समोर येत होत्या. तथापि, याविषयी दोघे कधीही उघडपणे काही बोलले नव्हते. २०२० साली दोघांचे लग्न होणार असल्याचे म्हटले जात होते, पण कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आले.

फोटो शेअर दिली साखरपुड्याची माहिती
त्यांच्या साखरपुड्याची माहिती स्वतः संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांनी आपापल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रोमँटिक फोटो शेअर करून दिली होती. सुगंधाने तिच्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “नेहमी सोबत.” त्याच वेळी संकेतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मला सुगंधा मिश्राच्या रूपात माझा सूर्यप्रकाश मिळाला.”

मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर
तसेच, सुगंधाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मेहंदी सोहळ्याचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिने हाताला मेहंदी लावली आहे आणि पोज देत ती सर्वांना तिची मेहंदी दाखवत आहे. मेहंदी सोहळ्या दरम्यान सुगंधाने हिरव्या रंगाचा लेहंगा घातलेला पाहायला मिळाला. यासोबत तिने जड दागिने घालून हे लूक पूर्ण केला होता.

यासोबत, संकेतनेही मेहंदी सोहळ्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ कॉल दरम्यानचे रेकॉर्डिंग आहे. व्हिडिओ कॉलवर सुगंधा आणि संकेत एकमेकांना मेहंदी दाखवताना दिसले. व्हिडिओ शेअर करत संकेतने कॅप्शनमध्ये लिहिले, “मेहंदी लगा के रखना!”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महिलेकडे स्तनपान करतानाचा व्हिडिओ मागणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्री नेहा धुपियाची चपराक; फोटो शेअर करत दिले सडेतोड प्रत्युत्तर

-अंकिताच्या बॅकलेस गाऊनमधील हॉट आणि बोल्ड लूकने चाहते घायाळ, सोशल मीडियावर फोटोंचा धुुमाकूळ

-मोठी बातमी! ‘फँड्री’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात कोरोनाच्या विळख्यात, चाहतेही पडले काळजीत; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा