Sunday, October 19, 2025
Home टेलिव्हिजन लग्नाच्या एका वर्षानंतर कॉमेडियन सुगंधा मिश्राची झाली अशी अवस्था, व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

लग्नाच्या एका वर्षानंतर कॉमेडियन सुगंधा मिश्राची झाली अशी अवस्था, व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

द कपिल शर्मा शो कार्यक्रमात आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या कॉमेडीने सर्वांनाच हसायला लावले. यांपैकीच एक नाव म्हणजे सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra). जबरदस्त अभिनय आणि अफलातून विनोदाच्या टायमिंगमुळे सुगंधा अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळतात. गेल्यावर्षीच सुगंधाने संकेत भोसलेसोबत (Sanket Bhosale) विवाह केला होता. नुकतेच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पुर्ण झाले असून सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये शिक्षिका म्हणून घराघरात आपला ठसा उमटवणारी कॉमेडियन, गायिका आणि होस्ट सुगंधा मिश्रा हिने गेल्या वर्षी तिचा प्रियकर संकेत भोसलेसोबत लग्न केले होते. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष उलटले असताना सुगंधाने तिच्या वैवाहिक आयुष्याची झलक दाखवली आहे. लग्नाच्या वर्षभरानंतर झालेले बदल पाहून चाहते चांगलेच मजा घेताना दिसत आहेत. सुगंधा मिश्राने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये संकेत भोसले पांढरा टी-शर्ट आणि काळी पँट घालून पुस्तक वाचताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये  सुगंधा मिश्रा मांजरीच्या गेटअपमध्ये पोहोचते आणि मांजरीचा आवाज काढू लागते. संकेत सुरुवातीला सहन करतो, पण नंतर चिडतो आणि कुत्र्याचा आवाज करतो, हे ऐकून सुगंधा तिथून पळून जाते. व्हिडिओ शेअर करताना सुगंधाने ‘रिलेटेबल’ असा कॅप्शन दिला आहे.  त्याचवेळी हा व्हिडिओ पाहून चाहतेही चांगलीच मजा घेताना दिसत आहेत. सुगंधाच्या या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या विनोदी व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

दरम्यान सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी २६ एप्रिल २०२१ रोजी पंजाबमधील जालंधरमध्ये लग्नगाठ बांधली होती. कोरोनामुळे सुगंधाच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक उपस्थित होते. सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले अनेक टीव्ही शोमध्ये एकत्र दिसले आहेत. सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले नुकतेच सुनील ग्रोव्हरच्या कॉमेडी शो गँग्स ऑफ फिल्मिस्तानमध्ये दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा