सध्या ज्या बहुप्रतिक्षित सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे, तो सिनेमा म्हणजे ‘शमशेरा’ होय. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर याच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. रणबीरच्या गाडीला अपघात झाला आहे. तो आपल्या ‘शमशेरा’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचला निघाला होता.
ट्रेलर लाँचला पोहोचल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने त्याचा अनुभव सांगितला. त्याने सांगितले की, ‘शमशेरा’ (Shamshera) सिनेमाच्या लाँच इव्हेंटमध्ये येण्यापूर्वी त्याचा अपघात झाला होता. याबाबत बोलताना अभिनेता म्हणाला की, “माझा आतापर्यंतचा दिवस खूप वाईट आहे. मला वेळेची खात्री आहे म्हणून माझा ड्रायव्हर प्रथम इन्फिनिटी मॉलवर (चुकीचे स्थान) घेऊन गेला. मी तळघरात पाहिले, तेव्हा कोणीच नव्हते. मग मला उशीर झाला. काच फुटली. मी बाहेर आलो, तेव्हा कोणीतरी माझ्या गाडीला धडक दिली. काच फोडल्यावर करणने सांगितले की, हे चांगलं आहे. आता मी इथपर्यंत पोहोचलो आहे.”
रणबीरसोबत मस्ती करत होता संजय दत्त
यानंतर पुढे त्याने संजय दत्त (Sanjay Dutt) याच्यासोबत काम करण्याच्या अनुभवावर चर्चा केली. तो म्हणाला, “तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी म्हणेल की, माझ्यासोबत उभा असलेला व्यक्ती माझी प्रेरणा आहे. माझ्याआधी तोच हिरो होता. माझ्या खोलीत याचेच पोस्टर असायचे. आधी मला त्याला जाणून घेण्याची संधी मिळाली होती. तसेच, मला त्याची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि आता मला त्याच्याशी भांडण्याची संधी मिळाली. हा प्रवास खूपच भारी आहे. कारण, तो मला एका भावाप्रमाणे आणि मित्राप्रमाणे वागवतो.”
रणबीर म्हणाला, “मी वाईट चित्रपट केले, तर तो मला फटकारतो. मला आठवते की, बर्फी आणि रॉकस्टार सिनेमात काम करत असताना मी त्याच्या जिममध्ये वर्कआउट करायचो. तो रोज यायचा आणि म्हणायचा की यार, दोन वर्षांपासून तू माझ्या जिममध्ये येतोस, तुझी बॉडी कुठे आहे. तो वारंवार म्हणायचा की, तू आता बर्फी करतोस, तुझा पुढचा सिनेमा कोणता असेल, पेडा-लाडू? तो मला नेहमी काहीतरी चांगलं करायला सांगतो आणि मला आशा आहे की, सर्वांना शमशेरा आवडेल.”
कधी होणार प्रदर्शित
करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘शमशेरा’ हा सिनेमा येत्या महिन्यात २२ जुलै, २०२२रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर डाकू शमशेराच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे, संजय दत्त ब्रिटिश सरकारसाठी काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तसेच, अभिनेत्री वाणी कपूर हीदेखील रणबीरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
- हजारो लोकांसमोर ‘भाईजान’ सलमानच्या डोळ्यात आलं पाणी, सुनील शेट्टी आहे कारण, वाचा सविस्तर
- ‘त्या’ धमकीमुळे सलमान ‘विक्रांत रोणा’च्या ट्रेलर लाँचला गैरहजर, किच्चा सुदीप म्हणाला, ‘भाईला सिनेमा…’
- जेव्हा डॉक्टरांनीही सोडल्या होत्या आशा, दिग्दर्शकाला म्हणालेले, ‘तुमच्याकडे आता फक्त २ आठवडे शिल्लक’