Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड सुहाना खानला वडीलांची आवडत नाही ‘ही’ गाेष्ट; म्हणाली, ‘ते मला जवळ घ्यायचे …’

सुहाना खानला वडीलांची आवडत नाही ‘ही’ गाेष्ट; म्हणाली, ‘ते मला जवळ घ्यायचे …’

सुपरस्टार शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वीच तिचा चाहता वर्ग खूप माेठा झाला आहे. साेमवारी (दि. 22 मे)ला आपला वाढदिवस साजरा करणारी सुहाना या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज‘ या वेबसिरीजमधून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. सुहाना काही काळापासून लाइमलाइटमध्ये असली तरी एकेकाळी तिला तिच्या वडिलांची पॉपुलॅरिटी खूप त्रास देत हाेती. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

सुहाना खान (suhana khan) हिला आता प्रसिद्धीझोतात राहणे आवडते, पण एकेकाळी तिला याचा तीव्र तिरस्कार होता. 2018मध्ये माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सुहानाने सांगितले होते की, “मला आधीच वाटू लागले होते की, आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं आहे. माझे वडील इतके लोकप्रिय आहेत असे मला कधीच वाटले नव्हते. ते मला शाळेत सोडायला यायचे तेव्हा लोक आमच्याकडे टक लावून बघायचे.”

सुहानाने या मुलाखतीत पुढे सांगितले की, ‘मला आठवते की, त्यांना माझे वडील म्हणुन बाेलावले जाते नव्हते. जे मला हवे होते. यामुळे मी खूप गोंधळून जायचे. जेव्हा ते मला मिठी मारायचे, तेव्हा मी त्यांना परत गाडीत ढकलायचे. मला त्याचा खूप तिरस्कार वाटत होता. या गोष्टीमुळे मी खुप सेल्फ कॉन्शियस झाली हाेती.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहानाने पुढे सांगितले, ‘मग मला नंतर कळले की, जर मला माझ्या वडिलांना मिठी मारायची असेल, तर त्यावेळी ते फक्त माझे वडील आहेत आणि मग मी त्यांना मिठी मारयची.’

वयाच्या 16व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुहाना खान शिक्षणासाठी परदेशात गेली होती. याबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘वेगळ्या वातावरणात राहणे आणि इतक्या नवीन लोकांना भेटणे यामुळे मला माझा आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत झाली. हे लहान गोष्टींबद्दल आहे, जसे की रस्त्यावरून चालणे किंवा ट्रेनमध्ये जाणे. मुंबईत ज्या गोष्टी करणे खूप अवघड होते. याच कारणांमुळे मला माझ्या घरचे कौतुक वाटू लागले’.( suhana khan not like the popularity of father shahrukh khan said i hated )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह

विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा