Wednesday, July 3, 2024

‘या’ व्यक्तीसोबत फिरतेय शाहरुख खानची लाडकी लेक, कॅमेरा पाहताच लपवले तोंड

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची(Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान(Suhana Khan) चित्रपटसृष्टीपासून दूर राहूनही अनेकदा चर्चेत असते. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर अनेक बातम्या येत असतात. ती अनेकदा तिच्या खास मैत्रिणी अनन्या पांडे(Ananya Pande) आणि शनाया कपूरसोबत(Shanaya Kapoor) दिसते. पण अलीकडे सुहानाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. वास्तविक, समोर आलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री अनन्या आणि शनायाशिवाय आणखी एका मैत्रिणीसोबत दिसत आहे. सुहानाचे या नव्या मित्रासोबतचे फोटो इंटरनेटवर सगळीकडे पसरले आहेत.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मंगळवारी रात्री सुहाना मन्नतच्या घराबाहेर एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली होती. यादरम्यान सुहाना पँपराझींच्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी चेहरा लपवतानाही दिसली, बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे चर्चेत असलेल्या सुहानाने लगेचच तिचा चेहरा लपविला. यादरम्यान कारमध्ये सुहानासोबत एक व्यक्ती दिसली, ज्याला तिचे चाहते मिस्ट्री मॅन म्हणून नाव देत आहेत. सुहानासोबतच या मिस्ट्री मॅननेही चेहरा लपवला. समोर आलेले फोटो पाहता, समोरच्या सीटवर खुशी कपूरही उपस्थित होती असे दिसते. सुहानाचे हे फोटो पाहून सोशल मीडियावर नेटिझन्स या मिस्ट्री मॅनबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या सुंदर फोटोवर कॉमेंट करताना नेटकऱ्याने- कोण आहे मिस्ट्री मॅन असा प्रश्न विचारला आहे. तर आणखी एकाने तो कोण आहे? म्हणत तिला याबद्दल छेडले आहे.

शाहरुख खान आणि गौरी यांची मुलगी सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत होती. सध्या ती ग्रॅज्युएशन पूर्ण करून भारतात परतली आहे. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने इंग्लंडच्या आर्डिंगली कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुहानाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलायचे झाले तर, अशी अपेक्षा आहे की ती लवकरच झोया अख्तरच्या लोकप्रिय कॉमिक आर्चीच्या हिंदी रूपांतरातून इंडस्ट्रीत पदार्पण करेल. जान्हवी कपूरची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा देखील प्रसिद्ध कॉमिकच्या या हिंदी रूपांतरातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सुहानाबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच सुहाना फॅन फॉलोइंगच्या बाबतीत मोठ्या स्टार्सशी स्पर्धा करताना दिसते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा